‘कंगनाविषयी कसलीही आत्मियता नाही…’; शबाना आझमी यांचं ट्विट चर्चेत

Kangana Ranaut | Shabana Azmi – बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना राणावतच्या थप्पड प्रकरणावर ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. शबाना आझमी म्हणाल्या की, ‘कंगना राणावतवविषयी आम्हाला कसलीही आत्मियता नाही.
पण तरीही ती थप्पड मारून सेलिब्रेट करणाऱ्यांच्या यादीत सामील होऊ शकत नाही. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कायदा हातात घेण्यास सुरुवात केली तर आपल्यापैकी कोणीही सुरक्षित राहणार नाही. अभिनेत्री शबाना आझमी यांनी सोशल मीडिया साइट एक्सवर ही माहिती दिली.
शबाना आझमी यांची ही प्रतिक्रिया बाॅलिवूडची प्रातिनिधिक प्रतिक्रिया मानली जात आहे. हिमाचलमधील मंडी येथून लोकसभा निवडणुकीत विजयी झालेली अभिनेत्री कंगना राणावत हिला चंदीगड विमानतळावर सीआयएसएफच्या कुलविंदर कौर नामक लेडी कॉन्स्टेबलने कंगनाला थप्पड मारली होती.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कंगना रणौत विमानतळावरील चेक-इन काउंटरवर जाताना दिसत आहे, तेव्हा त्यांच्यात वाद सुरू झाला.
I have no love lost for #Kangana Ranaut. But I can’t find myself joining this chorus of celebrating “the slap”. If security personnel start taking law into their hands none of us can be safe .
— Azmi Shabana (@AzmiShabana) June 7, 2024
मात्र, व्हिडिओमध्ये कंगनाला थप्पड मारताना दाखवलेली नाही. या घटनेनंतर कंगनाने एक व्हिडीओ जारी केला असून त्यात कुलविंदर कौर पंजाबमधील वाढत्या दहशतवादामुळे चिंतेत असल्याचे दिसून येते.
तिच्या व्हिडिओमध्ये कंगना म्हणाली, ‘मी सुरक्षित आहे आणि पूर्णपणे ठीक आहे. सुरक्षा तपासणीदरम्यान ही घटना घडली. महिला रक्षक माझी जाण्याची वाट पाहत होती. त्यानंतर तिने बाजूने येऊन मला थप्पड मारली. तिने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
मला का मारले असे विचारले असता कुलविंदर कौर म्हणाली, ‘मी शेतकऱ्यांचे समर्थन करते आणि पंजाबमधील वाढत्या दहशतवादामुळे मला काळजी वाटते. शेतकरी आंदोलनादरम्यान माझी आईही तिथे बसली होती. मात्र, कंगनाने म्हटले होते की, या आंदोलक भाडोत्री महिला होत्या.





