पुरुष क्रिकेट संघाचा खेळाडू व मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंतर शिखाने हा मान मिळविला.
\nआंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू बनण्यासाठी अत्यंत संकटांचा सामना करून आज हे यश मिळविणारी शिखा देशातील अनेक खेळाडूंसाठी प्रेरणा बनली आहे, असे व्यक्त करत वायुदलाने तिच्या सत्काराचा क्षण कॅमेरात बंदिस्त केला व सोशल मीडियावर पोस्ट केला. चाहत्यांनी या पोस्टला लाईक करत शिखाचे अभिनंदन केले आहे.