Nizar Amidi : कुर्दिश नेते निझार आमिदी (Nizar Amidi) यांची इराकच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. इराकच्या संसदेमध्ये अध्यक्षपदासाठी शनिवारी झालेल्या मतदानात दोन कुर्दिश राजकीय पक्षांपैकी एका पक्षाचे नेते आमिदी यांची निवड करण्यात आली. इराकमध्ये पाच महिन्यांपुर्वी संसदीय निवडणुका झाल्या होत्या. पण कोणत्याही एका गटाला निर्विवाद बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे अध्यक्षांची निवड (Nizar Amidi) केली जाऊ शकली नव्हती. अमेरिका-इराणमधील युद्ध सुरू असतानाच इराकमध्ये नवीन अद्यक्षांची (Nizar Amidi) निवड करण्यात आली आहे. इराणमधील सशस्त्र गटांकडून इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळ आणि उर्जा प्रकल्पांवर हल्ले केले जात असल्यामुळे या युद्धात इराकदेखील ओढला गेला आहे. दरम्यान अमेरिका आणि इस्रायलने इराणी सशस्त्र गटांना लक्ष्य करण्यासाठी केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये इराकच्या लष्कराचे काही सदस्य देखील मारले गेले आहेत. Nizar Amidi अध्यक्षपदी निवडले गेलेले आमिदी हे पॅट्रिओटिक युनियन ऑफ कुर्दिस्तान पार्टी या पक्षाचे नेते आहेत. अध्यक्षपदासाठी इराकचे विद्यमान परराष्ट्र मंत्री फौद हुसेन यांना प्रतिस्पर्धी कुर्दिस्तान डेमोक्रॅटिक पार्टीने पाठिंबा दिला होता. संसदेतल्या झालेल्या मतदानादरम्यान आमिदी यांनी हुसेन यांचा पराभव केला. पहिल्या फेरीत कोणत्याही उमनेदवाराला दोन तृतीयांश बहुमत मिळाले नाही. त्यामुळे दुसऱ्या फेरीच्या मतदानात सर्वसाधारण बहुमताने आमिदी (Nizar Amidi) यांचा विजय झाला. इराकमध्ये रुढीप्रमाणे अध्यक्ष नेहमीच कुर्दिश राहिला आहे. तर अध्यक्षांपेक्षा जास्त अधिकार असलेला पंतप्रधान शिया समुदायाचा आणि संसदेचे सभापती सुन्नी समुदायाचा असतो.