निवेदिता आणि अशोक सराफांनी अभिनेत्रीचं केलं खास केळवण; व्हिडिओ शेअर करत व्यक्त केल्या भावना

Ashok And Nivedita Saraf | मराठी मनोरंजन सृष्टीत सध्या लगीनघाई सुरू झाली आहे. अलीकडेच प्राजक्ता गायकवाड, पूजा बिरारी, सूरज चव्हाण या कलाकारांचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. यानंतर आता यात आणखी एका अभिनेत्रीचा समावेश होणार आहे.
अभिनेत्री रसिका वाखारकरकडे देखील आता लगीनघाई सुरू झाली आहे. नुकतेच अशोक सराफ आणि निवेदिता सराफ या जोडीने रसिकाचे पहिलं केळवण केलं. याचा खास व्हिडीओ अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शे अर केला आहे.
रसिका शुभांकर उंब्रानीसह लग्नबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वी दोघांचा साखरपुडा पार पडला होता.आता त्यांच्या लग्नाच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली असून अभिनेत्रीचं केळवण ‘अशोक मा.मा.’ मालिकेच्या संपूर्ण टीमने थाटात साजरं केलं आहे. Ashok And Nivedita Saraf |
View this post on Instagram
मालिकेची संपूर्ण टीम रसिकाच्या केळवणासाठी अशोक व निवेदिता सराफ यांच्या घरी पोहोचली होती. निवेदिता सराफ यांनी यावेळी रसिकाला सुंदर साडी भेट म्हणून दिली. मालिकेतील अन्य सहकलाकारांनी देखील अभिनेत्रीचं औक्षण केलं. सहकलाकारांचं हे प्रेम पाहून रसिका खूपच भारावून गेली होती. Ashok And Nivedita Saraf |
रसिकाने या सुंदर आठवणींची एक पोस्ट शेअर करत म्हंटले की, “मी खरंच नशीबवान आहे. माझं पहिलं केळवण या गोड व्यक्तींनी केलं. त्यांच्या प्रेमाने मी पूर्णपणे भारावून गेले आहे. हा क्षण मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. तुम्हा दोघांचेही खूप खूप आभार” या पोस्टमध्ये अभिनेत्रीने अशोक व निवेदित या दोघांनाही टॅग केलं आहे. यानंतर नेटकऱ्यांनी देखील रसिकावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. Ashok And Nivedita Saraf |
हेही वाचा:
Skin Care Tips: क्रिसमस आणि न्यू इयरच्या पार्टीत सुंदर दिसायचंय? मग आत्तापासून सुरू करा स्किन केअर!





