“नीतीश कुमार शिंदे नाहीत! मालकाच्या घरातून….; बिहारच्या बड्या नेत्याने एकनाथ शिंदेंना डिवचलं

Sanjay Raut post : नोव्हेंबर महिन्यात बिहार विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत पुन्हा एकदा एनडीए एकत्रित निवडणुकीला सामारे जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री पदाबाबत आतापासूनच चर्चांनी जोर धरला आहे. या निवडणुकीत नीतीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड (जेडीयू) पक्षाने जोरदार तयारी केली आहे.
भाजप आणि जेडीयूने प्रत्येकी १०१ उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याचे जाहीर केले आहे. या निवडणुकीत जेडीयूनकडून बिहारमध्ये जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. अशातच या पक्षाचे राज्यसभा खासदार आणि जेडीयू नेते के. सी. त्यागी यांनी एका मुलाखतीत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत विधान केले आहे.
के सी त्यागी यांनी शिंदे किंवा अजित पवार यांचे नेमके वर्णन मोजक्या शब्दात केले आहे!
एक मारा लेकिन सॉलिड मारा!
“शिंदे कोण? मालकाच्या घरातील सामान चोरून नेणारे नेते!”https://t.co/ILlziJwqOW— Sanjay Raut (@rautsanjay61) October 16, 2025
या विधानातून त्यांनी एकनाथ शिंदेंना डिवचलं आहे. नीतीश कुमार मालिका आहेत, शिंदे कोणत्याही मालकाचे नाव नाही, असे विधान के. सी. त्यागी यांनी केले आहे. उबाठाचे नेते राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी या पॅनेल चर्चेचा व्हिडीओ त्यांच्या एक्स अकाऊंटवरून शेअर केला आहे. एक मारा लेकिन सॉलिड मारा! “शिंदे कोण? मालकाच्या घरातील सामान चोरून नेणारे नेते!” असे राऊतांनी व्हिडीओसोबत लिहिले आहे.
नेमकं काय म्हणाले के. सी. त्यागी ?
जेडीयू आणि भाजपने याअगोदर समसमान सीटवर निवडणुका जिंकलेल्या नाहीत, हे अगोदर झालेले नाही. शिंदे यांनी स्थापित नेत्वृत्वाच्या विरोधात विद्रोह केला केला. त्यामुळे नीतीश कुमार शिंदे नाहीत. त्यांची तुलना शिंदंसोबत करू नका, शिंदे हे कोणत्या मालकाचे नाव नाही, मालकांच्या येथून सामान उचलून नेणारे त्यांचं नाव शिंदे आहे, असे म्हणत के. सी. त्यागी यांनी शिंदेंना डिवचलं आहे. पुढे ते दोन्ही( नीतीश कुमार, एकनाथ शिंदे) आमचे चांगले मित्र असल्याचे देखील ते म्हणाले.
…त्यामुळे त्यांची तुलना शिंदेंसोबत करू नका.
नीतीश कुमार यांनी आपल्या शौर्य आणि पराक्रमातून पहिल्यांदा आरजीडीसोबत लढून ते इतक्या मोठ्या पदापर्यंत पोहचले आहेत.नीतीश कुमार १९९५ साली वेगळे झाले, त्यावेळी अनेक पक्षांनी त्यांना डावलले. त्यानंतर त्यांनी खूप संघर्ष केला. त्यामुळे त्यांची तुलना शिंदेंसोबत करू नका.
हेही वाचा : सोनाक्षी सिन्हाच्या प्रेग्नेंसीच्या चर्चांदरम्यान पती झहीरने दिली मजेशीर रिअॅक्शन, व्हिडिओ व्हायरल





