‘दिल्लीवरून फोन आला अन् मला जीवे…’ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांचा पुन्हा एकदा गौप्यस्फोट

Nitin Deshmukh । ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी पुन्हा एकदा मोठा गौप्यस्फोट केला आहे. राज्यातील सत्तासंघर्षावेळी मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतला गेलो होतो.मला मारण्याचे षडयंत्र रचले गेले होते. असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा भाजप पक्षावर गंभीर आरोप केले आहे.
ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्यासमोर बव्हशन करतांना आमदार देशमुख म्हणाले,’मला भाजपच्या एका आमदाराने सांगितलं की, आपण ज्यावेळी सुरतला गेला होता त्यावेळी दिल्लीवरून एक फोन आला होता. कोणत्याही परिस्थितीत नितीन देशमुख परत जाता कामा नये, मारून टाकायचे काम पडले तर गेम करून टाका. तेव्हा टीव्हीवर बातमी पसरवली गेली, मला हृदयविकाराचा झटका आलाय म्हणून. मात्र दिल्लीवरून फोन येतो आणि ऐकत नसेल तर मारून टाका, असे त्यावेळी सांगण्यात आले. हे सर्व मला एका भाजपच्या आमदाराने सांगितले. असल्याचा मोठा गौप्यस्फोट देशमुख यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले,’शिवसेना शिंदे गटाने माझी चौकशी लावली खरी, पण आता माझ्या मुलासह आठव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीचीही ACB कडून चौकशी लावलीय. परंतु आपण कधीही डगमगलो नाही. आपण सुरतला गेलो होतो, तेव्हा माझ्या सोबत घात करण्याचा प्रयत्न झाला. मला इंजेक्शन देण्यात आले होते. तेव्हा बातमी पसरली की, आमदार देशमुखांना हृदय विकाराचा झटका आला. आपल्याला कोणताही झटका आला नव्हता असे म्हणत नितीन देशमुखांनी या बाबत स्पष्टीकरण ही दिले आहे. दरम्यान, मला पराभूत करण्यासाठी आज कटकारस्थान रचले जात असल्याचेही आमदार देशमुखांनी यावेळी म्हटले आहे.





