Nitesh Rane : आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावर भाजप नेत्याची टीका; म्हणाले ‘लव्ह जिहाद’चा ब्रँड अॅम्बेसेडर
Nitesh Rane : आमिर खान कडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही

Nitesh Rane : बॉलीवूड सुपरस्टार आमिर खान तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकल्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. ५ जुलै रोजी त्याची मैत्रीण गौरी हिच्यासोबत त्याने तिसरे लग्न केले. यावरून आता राजकीय वर्तुळात देखील प्रतिक्रिया उमटत आहे. मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी आमिर खानवर निशाणा साधत त्याला थेट ‘लव्ह जिहाद’चा ब्रँड अॅम्बेसेडर म्हटले आहे.
माध्यमांशी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले, “हिंदू समाज, विशेषतः तरुणांनी हा विचार करण्याची गरज आहे कि ते कोणत्या लोकांना आपले आदर्श मानत आहेत. जेव्हा मोठे सेलिब्रिटी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित निर्णय घेतात, तेव्हा त्याचा परिणाम समाजावरही होतो.”
पुढे ते म्हणाले, “लव्ह जिहादचे ब्रँड अॅम्बेसेडर कोण आहेत? आमिर खान बनत चालले नाहीत का? हिंदू तरुणांनी विचारपूर्वक ठरवले पाहिजे की त्यांनी कोणाचे चित्रपट पाहावेत आणि त्यांना किती पाठिंबा द्यावा.”
दरम्यान, नितेश राणे यांच्या या विधानावर अभिनेता आमिर खान कडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, या विधानामुळे राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
कुटुंबीयांच्या उपस्थित निवासस्थानी विवाह
आमिर खानने जुलैच्या पहिल्या आठवड्यात त्याची मैत्रीण गौरी स्पॅटसोबत मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या निवासस्थानी विवाह केला. ज्यामध्ये केवळ त्याचे कुटुंबीय आणि काही अत्यंत जवळचे मित्र सहभागी झाले होते.
गौरी स्प्रॅट कोण आहे?
मूळची बंगळुरूची असलेली गौरी स्प्रॅट सौंदर्य आणि वेलनेस उद्योगात कार्यरत आहे. ती ‘बी ब्लंट’ या सलून चेनची भागीदार आणि संचालकही होती. सध्या गौरी आमिर खान प्रॉडक्शन्समध्ये साहाय्य करते. गौरीचंही हे दुसरं लग्न असून तिला सहा वर्षांचा एक मुलगा आहे. Nitesh Rane
तर याआधी आमिर खानचे पहिले लग्न १९८६ मध्ये रीना दत्तासोबत झाले होते. ज्यांच्यापासून तो २००२ मध्ये वेगळा झाला. त्यानंतर २००५ मध्ये त्याने चित्रपट निर्माती किरण राव हिच्याशी दुसरे लग्न केले आणि २०२१ मध्ये त्यांचाही घटस्फोट झाला. या दोन लग्नांनंतर आता आमिर खानने गौरी स्पॅटसोबत तिसऱ्यांदा संसार थाटला आहे. ज्यामुळे त्याच्या जोरदार टीका केली जात आहे. Nitesh Rane
हेही वाचा:







