NCP News : शरद पवारांना मोठा धक्का ! ‘या’ बड्या नेत्याला अटक
सोशल मीडियावर आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जाणारे प्रसिद्ध प्राध्यापक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP News) नेते नितेश कराळे (कराळे मास्तर) यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

NCP News : सोशल मीडियावर आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जाणारे प्रसिद्ध प्राध्यापक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP News) नेते नितेश कराळे (कराळे मास्तर) यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाबद्दल आक्षेपार्ह आणि अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या गंभीर आरोपावरून वर्धा शहर पोलिसांनी आज पहाटेच्या सुमारास धडक कारवाई करत त्यांना अटक केली. या नाट्यमय कारवाईमुळे (NCP News) राजकीय आणि सामाजिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
वर्ध्यातील फिनिक्स अकॅडमीचे संचालक, सामाजिक कार्यकर्ते आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अशी ओळख असलेले कराळे मास्तर यांनी ३१ जुलै २०२६ रोजी ‘आरक्षण हटाव’ या विषयावर एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
या व्हिडिओमधील विधानांमुळे समाजात जातीय तेढ निर्माण होऊ शकते, असा आक्षेप घेत अजय शंकरराव डोंगरे यांनी पुराव्यासह वर्धा पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल केली होती.
तक्रारदाराने सादर केलेली व्हिडिओ लिंक आणि इतर तांत्रिक पुराव्यांची प्राथमिक पडताळणी केल्यानंतर, पोलिसांनी नितेश बाळकृष्ण कराळे यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रॉसिटी) आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी वेगाने (NCP News) हालचाली करत पहाटे कराळे मास्तरांना ताब्यात घेऊन अटक केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास वर्धा पोलीस करत आहेत.






