Cabinet Meeting : फडणवीस सरकारचे ४ मोठे निर्णय; राज्याला मिळणार आणखी एक न्यायालय, ‘या’ जिल्ह्याना मोठा फायदा
Cabinet Meeting : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यासाठी चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

Cabinet Meeting : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यासाठी चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. क्रीडा, उच्च व तंत्रशिक्षण, महसूल व वन आणि विधि व न्याय विभागाशी संबंधित या निर्णयांचा विविध जिल्ह्यांना फायदा होणार आहे. (Cabinet Meeting)
१. खेळाडूंच्या रोख बक्षिसाच्या धोरणात बदल
आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील खेळाडू तसेच त्यांच्या क्रीडा मार्गदर्शकांना दिल्या जाणाऱ्या रोख बक्षिसाच्या धोरणात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Cabinet Meeting()
२. नागपूर आणि अहिल्यानगरला विद्यापीठांची भेट
उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत नागपूर येथे लता मंगेशकर विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अहिल्यानगर येथे डॉ. बाळासाहेब विखे पाटील विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. या खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठात वैद्यकशास्त्र, दंतवैद्यक, फिजिओथेरपी आणि नर्सिंगमधील पदवी, पदव्युत्तर तसेच सुपर स्पेशॅलिटी अभ्यासक्रम सुरू होणार आहेत. (Cabinet Meeting)
३. जत नगरपरिषदेसाठी शासकीय जमीन
महसूल व वन विभागांतर्गत जत नगरपरिषदेला प्रशासकीय इमारत उभारण्यासाठी २,५८५ चौ. मीटर शासकीय जमीन देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ही जमीन मौजे जत, जिल्हा सांगली येथे आहे. (Cabinet Meeting)
४. नाशिकला आणखी एक दिवाणी न्यायालय
विधि व न्याय विभागाचा महत्त्वाचा निर्णय म्हणजे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) येथे वरिष्ठ स्तराचे दिवाणी न्यायालय स्थापन करण्यात येणार आहे. या न्यायालयासाठी आवश्यक पदनिर्मिती आणि अनुषंगिक खर्चाच्या तरतुदीलाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. (Cabinet Meeting)






