नीता अंबानीने केला शाहरुखसोबत ‘जबरदस्त डान्स’

Bollywood news । अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अनंतच्या लग्नात अनेक सेलेब्सने दिलखुलासापणे डान्स केला. बॉलिवूड सेलिब्रिटींनी या लग्नात धमाल केली.अशात सोशल मीडियावर फक्त अनंत आणि राधिकाचे फोटो व्हायरल होत आहेत. वराच्या आईचा म्हणजेच नीता अंबानीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती शाहरुख खानसोबत जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.
View this post on Instagram
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट विवाहबंधनात अडकले यादरम्यान शाहरुख खान अनंत अंबानींच्या लग्नाच्या वरातीत दाखल झाला तेव्हा नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांनीही शाहरुख खानसोबत डान्स केला.
View this post on Instagram
शाहरुख खानने नीता अंबानींसोबत त्याच्या सिग्नेचर पठाण मूव्हसह डान्स केला. नीतानेही शाहरुखला मिठी मारली. साधारणपणे शाहरुख खान पापाराझींसाठी पोज देणे टाळत असला तरी लग्नात तो मोकळेपणाने पोज देताना आणि एन्जॉय करताना दिसला.
याशिवाय आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शाहरुख खान आणि सलमान खान एकाच फ्रेममध्ये दिसत आहेत. शाहरुख खान आणि सलमान खानही एकत्र नाचताना दिसत आहेत. दोघेही हातात हात घालून डान्स करत खूप मस्ती करताना दिसले. लग्नात सलमान खान ब्लॅक लूकमध्ये दिसत होता, तर शाहरुख खान ऑलिव्ह ग्रीन कलरच्या पठाणीमध्ये खूपच सुंदर दिसत होता. या लग्नाला शाहरुख खान त्याच्या संपूर्ण कुटुंबासह उपस्थित होता.





