Buldhana News : आषाढी एकादशीनिमित्त शेवगावमधील गजानन महाराज मंदिरात भाविकांची गर्दी
Buldhana : प्रति पंढरपूर म्हणून शेगावची ओळख

Buldhana : आषाढी एकादशी निमित्त विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगाव येथील संत गजानन महाराज समाधी मंदिरात लाखो भाविकांनी गर्दी केलेली आहे. आज सकाळपासूनच आषाढी एकादशीनिमित्त शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत.
आषाढी एकादशी निमित्त राज्यातूनच नव्हे तर शेजारील मध्य प्रदेश गुजरात मधून लाखो भाविक शेगावात दाखल झाले आहे. मोठ्या भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशीचे कार्यक्रम शेगावात पार पडत आहे. तर येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिरा प्रशासनाने सुद्धा रात्रभर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले ठेवले आहे. आज दिवसभर भाविकांची शेगावात मांदियाळी पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, पंढरपूरमध्ये भाविकांची सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. पंढरपुरातील विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांनी सजवण्यात आले होते. मंदिरावर करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईमुळे मंदिराचे पावित्र्य अधिकच खुलले होते. राज्यभरातून आलेल्या हजारो वारकऱ्यांनी आणि भाविकांनी चंद्रभागेच्या तीरावर आणि पंढरपूरच्या मार्गांवर अलोट गर्दी केली आहे.
CJP Protest : “सरकार जर आमच्या मुख्य मागण्यांकडे कानाडोळ करेल तर…”; CJP चा केंद्र सरकारला थेट इशारा





