“स्वाती मालीवाल प्रकरणी केजरीवालांनी माफी मागावी” ; निर्मला सीतारामन यांची मागणी

Nirmala Sitharaman on Kejriwal। स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मुद्दा दिवसेंदिवस तापत चालला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आम आदमी पक्षाच्या (आप) राज्यसभा खासदारासोबत झालेल्या मारहाणीप्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात आहेत. त्याचवेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वाती यांच्यासोबत झालेल्या गैरवर्तणुकीबाबत केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केलाय. स्वाती यांच्यावर हल्ला करणारा विभव कुमार हा केजरीवाल यांचा राईट हॅन्ड आहे, त्यामुळे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केलीय.
भाजप नेत्या सीतारामन यांनी,”स्वाती यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना १३ मे रोजी उघडकीस आली. मात्र चार दिवस उलटूनही मुख्यमंत्री एक शब्दही बोललेले नाहीत. त्यांनी या प्रकरणी माफी मागितली पाहिजे. केजरीवाल यांचा राईट हॅन्ड समजल्या जाणाऱ्या विभव कुमारने स्वातीला मारले आहे, त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे संजय सिंह सांगतात, मात्र अद्याप तसे झालेले नाही. हे प्रकरण केजरीवाल याना माहिती असल्याचे आप नेते संजय सिंह यांनी म्हटले होते.
केजरीवालांकडून उत्तरे देण्यास टाळाटाळ Nirmala Sitharaman on Kejriwal।
पुढे बोलताना सीतारामन यांनी,”आम आदमी पक्षाचे प्रमुख खासदार कारवाई करणार असल्याचे सांगतात मात्र ते स्वत: आरोपींसोबत फिरत आहेत. लखनऊमध्ये समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत केजरीवाल यांना स्वाती मालीवाल यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता, त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. यावरून निर्मला सीतारामन यांनी टीका केली.
निवडणुकीत एकही महिला उमेदवार नाही’ Nirmala Sitharaman on Kejriwal।
महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून निर्मला सीतारामन यांनी आम आदमी पक्षालाही धारेवर धरले. ते म्हणाले की, दिल्लीतील महिलांना प्रश्न पडतो की हे मुख्यमंत्री महिलांना सुरक्षा देणार का? केजरीवाल महिलांच्या विरोधात आहेत. त्यांच्या पक्षाचे चारित्र्य पहा. ‘आप’ने दिल्लीत एकही महिला उमेदवार निवडणुकीत उभी केली नसल्याचे निदर्शनास आणून दिली,





