Nirav Modi : प्रत्यार्पणावरील आव्हान याचिकेवर फेरसुनावणी घ्या; नीरव मोदीने केली मागणी
फरार हिरे व्यापारी नीरव मोदी (Nirav Modi) याने ब्रिटनकडून भारताकडे प्रत्यार्पण करण्याला लंडनमधील उच्च न्यायालयात दिलेल्या आव्हान याचिकेवर पुन्हा सुनावणी करण्याची मागणी केली आहे.

Nirav Modi : फरार हिरे व्यापारी नीरव मोदी (Nirav Modi) याने ब्रिटनकडून भारताकडे प्रत्यार्पण करण्याला लंडनमधील उच्च न्यायालयात दिलेल्या आव्हान याचिकेवर पुन्हा सुनावणी करण्याची मागणी केली आहे.
भारतात प्रत्यार्पण (Nirav Modi) केले गेल्यास चौकशी दरम्यान आपला छळ केला जाईल, अशी भीती आपल्याला वाटत असल्याचे त्याने म्हटले आहे. त्याच्या या आव्हान याचिकेवरील निकाल लॉर्ड जेरेमी स्टुआर्ट स्मिथ आणि जस्टीस रॉबर्ट जे यांनी दिवसभरासाठी राखून ठेवला आहे.
नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी भारतातील अधिकारी लंडन येथे गेले असून या प्रकरणाचा अंतिम निकाल लवकरच दिला जाईल, असे न्यायालयाने सांगितले. दोन दिवसात या खटल्याची सुनावणी पुर्ण होणे अपेक्षित आहे. भारतात पंजाब नॅशनल बँकेच्या कर्जामध्ये अंदाजे २ अबज डॉलरचा आर्थिक गैरव्यवहार, मनी लॉन्डरिंगकेल्याबद्दल नीरव मोदी वॉन्टेड आहे.
त्याला सध्या लंडनच्या उत्तरेकडील पेंटोनविले येथील तुरुंगात ठेवण्यात आले आहे. तेथूनच व्हिडीओ लिंकच्या माध्यमातून तो न्यायालयाच्या सुनावणीमध्ये सहभागी झाला होता. नीरव मोदी याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यात यावे, असे आदेश न्यायालयाने ६ वर्षांपुर्वी दिले आहेत.
पण कर चुकवेगिरी आणि मनी लॉन्डरिंगचा आरोप असलेला संरक्षण क्षेत्रातील सल्लागार असलेल्या संजय भंडारी याला मानवी हक्कांच्या आधारे वर्षभरापुर्वी प्रत्यार्पणाच्या प्रकरणातून जामीनावर मुक्त करण्यात आले होते.
नीरव मोदी (Nirav Modi) याच्या वकिलांनी याच प्रकरणाचा हवाला न्यायालयात दिला आहे. पण भारताच्या वतीने या दाव्याला विरोध केला गेला आणि खटल्याची पुन्हा सुनावणी करायला आक्षेप घेतला आहे.






