नीरव मोदीच्या कोठडीला 17 ऑक्‍टोबरपर्यंत मुदतवाढ

लंडन : सुमारे 2 अब्ज डॉलर्सच्या पंजाब नॅशनल बॅंकेच्या (पीएनबी) फसवणूक आणि मनी लॉन्डरिंग प्रकरणी अटक करण्यात आलेल्या फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या न्यायालयीन कोठडीला 17 ऑक्‍टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. लंडनच्या तुरुंगातून व्हिडीओलिंकच्या माध्यमातून नियमितपणे “कॉल-ओव्हर’ रिमांड सुनावणीसाठी वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट्‌स कोर्टात हजर झाला. त्यावेळी कोर्टाने त्याच्या कोठडीत वाढ केली.

नीरवच्या खटल्यावरील सुनावणी पुढील वर्षी 11 ते 15 दरम्यान होणार आहे. नीरवला दक्षिण-पश्‍चिम लंडनच्या
सर्वाधिक गर्दीच्या तुरूंगांपैकी एक वॅन्ड्‌सवर्थ कारागृहात ठेवण्यात आले आहे. यावर्षी 1 मार्च रोजी स्कॉटलंड यार्डने भारत सरकारच्या आरोपावरून प्रत्यार्पणाच्या वॉरंटवरून त्याला अटक केली. युकेच्या क्राउन प्रॉसिक्‍युशन सर्व्हिसने (सीपीएस) भारताच्यावतीने न्यायालयात बाजू मांडली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.