अभिषेक बच्चनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर निम्रत कौरने सोडलं मौन

Nimrat Kaur | ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या मागील काही दिवसांपासून घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. तर दुसरीकडे निम्रत कौर आणि अभिषेक बच्चन यांची नाव गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जोडले जात आहेत. मात्र या अफेअरच्या वृत्तावर अभिषेक बच्चनने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु निम्रतने याप्रकरणावर मौन सोडले आहे.
एका मुलाखतीदरम्यान निम्रतला याबाबत विचारण्यात आले. तेव्हा ती म्हणाली, ‘मी काहीही करू शकते, पण लोक त्यांना हवं तेच म्हणतील. अशा प्रकारच्या अफवांना रोखणं इतकं सोपं नाही. मी फक्त माझ्या कामावर लक्ष देणं पसंत करते.’
अभिषेक बच्चन आणि निम्रत कौर हे सहकलाकार आहेत. या दोघांनी 2022 साली प्रदर्शित झालेल्या दसवी चित्रपटात एकत्र काम केले होते. तुषार जलोटा दिग्दर्शित या चित्रपटात निम्रतने अभिषेकच्या पत्नीची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता त्यांच्या अफेअरच्या बातम्या व्हायरल होत आहेत.
या वर्षाच्या सुरुवातीपासूनच अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या येत आहेत. ऐश्वर्या बच्चनही कुटुंबापासून वेगळी राहत असल्याचे बोलले जात आहे. अभिषेकसोबत ऐश्वर्या कोणत्याही अवॉर्ड फंक्शनला किंवा कौटुंबिक पार्टीला देखील उपस्थित नसल्याने चर्चांना उधाण येते. मात्र, अद्यापपर्यंत ऐश्वर्या किंवा अभिषेकने या बातम्यांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. Nimrat Kaur |
निम्रत कौरबद्दल बोलायचे झाले, तर ती सिनेविश्वातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे. अक्षय कुमारच्या एअरलिफ्ट या चित्रपटातून तिला लोकप्रियता मिळाली. तिने पेडलर्स आणि द लंचबॉक्स सारख्या चित्रपटांमध्येही आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. लवकरच तिचा ‘सेक्शन 84’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. Nimrat Kaur |
हेही वाचा:
‘दिवाळीत फटाके फोडतांना केस जळाले होते’ माधुरी दीक्षितने सांगितला किस्सा





