नवी दिल्ली : दिनांक १५ जानेवारी या दिवशी भारतीय नौदल तीन आघाडीच्या लढाऊ जहाजांना नेव्हल डॉकयार्ड, मुंबई येथे एकाच कार्यक्रमात नौदलाच्या ताफ्यात सामील करून घेणार आहे. आयएनएस निलगिरी हे प्रोजेक्ट १७ ए स्टेल्थ फ्रिगेट अर्थात विनाशिका श्रेणीतील प्रमुख जहाज. आयएनएस सुरत हे प्रोजेक्ट १५ बी स्टेल्थ विनाशिका श्रेणीतील चौथे आणि अंतिम जहाज; तर वाघशीर ही स्कॉर्पिन-श्रेणी प्रकल्पाची सहावी आणि अंतिम पाणबुडी या समारंभात भारतीय नौदलात सामील केली जाणार आहे. या तीनही लढाऊ युद्धनौका यांचे आरेखन आणि बांधणी संपूर्णपणे मुंबईतील माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड येथे करण्यात आली आहे. या प्रगत युद्धनौका आणि पाणबुड्या यशस्वीरित्या कार्यान्वित केल्याने युद्धनौका आरेखन आणि बांधणी क्षेत्रात भारताने केलेल्या जलद प्रगतीवर प्रकाश पडण्याबरोबर संरक्षण उत्पादनात जागतिक प्रमुख म्हणून भारताचे स्थान आणखी मजबूत झाले आहे. निलगिरी हे प्रोजेक्ट १७ ए चे प्रमुख जहाज, शिवालिक-श्रेणीतील युद्धनौकांच्या तुलनेत एक मोठी प्रगती असून यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे महत्त्वपूर्ण स्टेल्थ वैशिष्ट्ये आणि कमी रडार सिग्नेचर समाविष्ट आहेत. आधुनिक विमान वाहतूक सुविधांसह सुसज्ज, निलगिरी आणि सूरतमध्ये चेतक, एएलएच, सी किंग आणि नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या एमएच-६० आर यासह अनेक हेलिकॉप्टरचा समावेश असून हे हेलिकॉप्टर दिवसा आणि रात्री दोन्हीवेळा चालणाऱ्या मोहीमांमध्ये सहभागी होऊ शकतात. रेल-लेस हेलिकॉप्टर ट्रॅव्हर्सिंग सिस्टीम तसेच व्हिज्युअल एड आणि लँडिंग सिस्टीम यासारखी आधुनिक वैशिष्ट्ये सर्व परिस्थितींमध्ये मोहीम अखंड चालू राहील हे सुनिश्चित करतात. या जहाजांमध्ये महिला अधिकारी आणि महिला खलाशांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यासाठी विशिष्ट निवासस्थानांचा देखील समावेश केला आहे. वागशीर, ही कलवरी-श्रेणी प्रकल्प ७५ अंतर्गत सहावी स्कॉर्पीन-श्रेणीची पाणबुडी असून ती जगातील सर्वात शांत आणि डिझेल-इलेक्ट्रिक दोन्ही इंधनांनवर चालणाऱ्या बहुमुखी पाणबुड्यांपैकी एक आहे. पृष्ठभागविरोधी युद्ध, पाणबुडीविरोधी युद्ध, गुप्त माहिती गोळा करणे, क्षेत्र निरीक्षण आणि विशेष मोहीम यासह विविध मोहिमा हाती घेण्यासाठी या पाणबुडीची रचना करण्यात आली आहे. ही पाणबुडी वायर-मार्गदर्शित टॉर्पेडो अर्थात पाणतीर , जहाजविरोधी क्षेपणास्त्रे आणि प्रगत सोनार सिस्टीमसह सज्ज असून पाणबुडीमध्ये मॉड्यूलर बांधकाम देखील आहे. निलगिरी, सुरत आणि वागशीरचे एकत्रित नौदलात सामील होणे हे संरक्षण स्वावलंबन आणि स्वदेशी जहाजबांधणीमध्ये भारताची अतुलनीय प्रगती दर्शवणारे आहे.