Nilesh Rane | राज्यातील 288 विधानसभा मतदार संघातील निकाल स्पष्ट होत आहे. अनेक नेत्यांची यंदा विधानसभा निवडणुकीत प्रतिष्ठापणाला लागली होती. यात अनेक दिग्गज नेतेमंडळींना पराभवाचा सामना करावा लागला. यातील राणे बंधुंच्या मतदार संघाकडेही सर्वांचे लक्ष लागले होते. यंदा कोकणात आमदार नितेश राणे आणि निलेश राणे दोघेही निवडणुकीच्या रिंगणात होते. या दोन्ही बंधुंचा कोकणात मोठा विजय झाला आहे. निलेश राणे यांनी निवडणुकांपूर्वीच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करुन निवडणूक लढवली होती. अखेर, त्यांना कुडाळ मतदारसंघात यश मिळाल्याचं पाहायला मिळाले आहे. सुरुवातीला यातच आता कुडाळ विधानसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले निलेश राणे हे पिछाडीवर होते. तर ठाकरे गटाचे वैभव नाईक हे आघाडीवर आहेत. अखेर वैभव नाईक यांचा पराभव करत निलेश राणे यांनी विजय मिळवला आहे. नितेश राणेंचाही विजय तर दुसरीकडे, नितेश राणे यांना तब्बल 53 हजार मतांचं मताधिक्य मिळालं आहे. 53,893 मतांनी नितेश राणे विजयी झाल्याने त्यांचा हा मोठा विजय झाला आहे. कणकवली विधानसभा मतदार संघातून भाजपने नितेश राणे यांना उमेदवार दिली होती. येथे शिवसेना ठाकरे गटाने संदेश पारकर यांना तिकीट दिलं होतं. दरम्यान, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांना कुडाळ मतदारसंघातून पराभवाला सामोरे जावे लागले होते. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आता नीलेश राणे रिंगणात उतरले होते. त्यामुळे राणे कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अखेर निलेश राणे येथून विजय मिळवत स्वत:ला सिद्ध केले आहे.