“ट्रम्प यांचे शब्द गांभीर्याने घ्या..” ; टॅरिफ वादावर निक्की हेलीचा भारताला सल्ला

Nikki Haley। संयुक्त राष्ट्रांमधील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हेली यांनी, भारत आणि अमेरिकेच्या संबंधाविषयी मह्त्वाचए विधान केले आहे. त्यांनी,”भारताने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे रशियन तेल खरेदी करण्याच्या मुद्द्यावरचे विधान गांभीर्याने घ्यावे आणि व्हाईट हाऊससोबत लवकरच तोडगा काढावा ‘हे जितक्या लवकर होईल तितके चांगले.” असे म्हणत त्यांनी महत्वाचा सल्ला दिला.
‘अमेरिकेला भारतासारख्या मित्राची गरज आहे’ Nikki Haley।
निकी हेली यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये, “जगातील दोन सर्वात मोठ्या लोकशाही शक्तींमधील दशकांपासूनची मैत्री आणि विश्वास हा सध्याच्या मतभेदांच्या पलीकडे जाण्यासाठी एक मजबूत पाया आहे.”असे त्यांनी म्हटले. तसेच पुढे “व्यापार वाद आणि रशियाकडून तेल आयात यासारख्या मुद्द्यांवर कठोर वाटाघाटी आवश्यक आहेत, परंतु समान उद्दिष्टे सर्वात महत्त्वाची आहेत”असेही त्यांनी म्हटले. त्यांच्या मते, “चीनचा सामना करण्यासाठी अमेरिकेला भारतासारख्या मित्राची आवश्यकता आहे” असेही त्यांनी म्हटले .
यापूर्वीही इशारा देण्यात आला होता
यापूर्वीही निक्की हेली यांनी इशारा दिला होता की,”भारत-अमेरिका संबंध एका नाजूक वळणावर उभे आहेत. न्यूजवीकमध्ये लिहिलेल्या एका लेखात त्यांनी म्हटले होते की, रशिया तेल आणि शुल्क वादामुळे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये कायमचा दुरावा निर्माण होऊ देऊ नये.”
‘चीन या दरीचा फायदा घेऊ शकतो’ Nikki Haley।
हेली यांच्या मते, “चीनच्या आर्थिक विस्तारानंतर भारताचा उदय हा सर्वात मोठा भू-राजकीय विकास आहे आणि भारत जसजसा मजबूत होईल तसतसे चीनच्या महत्त्वाकांक्षा कमकुवत होतील. ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात थेट संवाद साधण्याचे आवाहन त्यांनी केले आणि सांगितले की जर वेळेवर पावले उचलली गेली नाहीत तर बीजिंग या दरीचा फायदा घेऊ शकते.” असेही त्यांनी म्हटले.





