पुसेगाव, (प्रतिनिधी)- निकिता पाचांगणे हिने पालकांच्या आशीर्वादाने एमपीएससी परीक्षेतून पीएसआय पदाला गवसणी घातली. या पालकांचा आदर्श घेऊन वर्धनगड पंचक्रोशीतील पालकांनी आपले पाल्य उच्च पदावर जाण्यासाठी विचार करण्याची गरज आहे, असे मत पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांनी व्यक्त केले. वर्धनगड (ता. खटाव) येथील निकिता पाचांगणे हिची पीएसआयपदी नियुक्ती झाल्यानंतर वर्धनगड मुस्लिम समाजाच्यावतीने तिचा सत्कारकरण्यात आला. त्यावेळी आशिष कांबळे बोलत होते. यावेळी सरपंच अर्जुन मोहिते, जालिंदर पाचांगणे, राजेंद्र वरेकर, पोपटराव चव्हाण, अण्णा पाचांगणे, अर्जुन कुंभार, शंकर अनपट उपस्थित होते. कांबळे म्हणाले, “निकिताने घेतलेले कष्ट यशस्वी झाले असून नवीन पिढीला तिचे हे यश प्रेरणा देणारेआहे. जीवनामध्ये कुठलीही गोष्ट अवघड नाही. परंतु, ती जिद्दीने अवगत करण्याची हिंमत ठेवली पाहिजे, असे निकिता पाचांगणे हिने सांगितले. सरपंच अर्जुन मोहिते यांनीही मनोगत व्यक्त केले. हुसेन शिकलगार यांनी प्रास्ताविक केले. निसार शिकलगार यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रियाज शिकलगार, हाजी गफूर शिकलगार, रशीद भालदार, हशम शिकलगार, शागीर शिकलगार आदींनी परिश्रम घेतले. शमशुद्दीन शेख, भिकनभाई मुलाणी, बशीर मुलाणी, अकबर भालदार, अभिजित पाचांगणे, पोलीस पाटील गणेश जठार, विकास जाधव, अमोल जगदाळे, शंकर पाचांगणे, मुस्लिम समाजाचे सर्व तरुण या कार्यक्रमास उपस्थित होते.