Nighoje accident : काळजाचा थरकाप उडवणारी घटना! क्रेनच्या धडकेत तरुण कामगाराचा जागीच मृत्यू
Nighoje accident : खेड तालुक्यातील निघोजे येथील एका खासगी कंपनीत क्रेन चालकाने हयगयीने वाहन चालवल्यामुळे एका कामगाराचा चिरडून मृत्यू झाला आहे.

Nighoje accident – खेड तालुक्यातील निघोजे येथील एका खासगी कंपनीत क्रेन चालकाने हयगयीने वाहन चालवल्यामुळे एका कामगाराचा चिरडून मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी (दि. १४ मे) रोजी दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास घडली आहे. या अपघातात सत्येंद्र श्रीनिवास साकेत (वय २१) या तरुणाचा मृत्यू झाला आहे.
याप्रकरणी करण शिवकुमार साकेत (वय १८, रा. चिखली) यांनी शुक्रवारी (दि. १५ मे) रोजी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी क्रेन चालक अंकितकुमार ओम प्रकाश मंजी (मूळ रा. बिहार, सध्या रा. महाळुंगे) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निघोजे येथील अँडेरीवा इन्फ्राटेक कंपनीत अँगलची वाहतूक सुरू असताना गुरुवारी दुपारी ही घटना घडली. क्रेनला जोडलेले अँगल उचलत असताना चालक अंकितकुमार याने क्रेन अत्यंत निष्काळजीपणे चालवली.
यामुळे सत्येंद्र हा खाली पडला आणि क्रेनचे टायर त्याच्या अंगावरून गेले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सत्येंद्रचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक पिंजारी करीत आहेत.




