Nicolas Maduro : अमेरिकेने जप्त केले व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांचे विमान

Nicolas Maduro : व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलास मधुरो यांच्यावरील निर्बंधांची अंमलबजावणी करताना अमेरिकेने त्यांचे खाजगी विमान दासो ऑफ फाल्कन 900ईएक्स हे डोमिनिका रिपब्लिक मधून जप्त केले आहे. या विमानाची किंमत एक कोटी तीस लाख अमेरिकी डॉलर आहे. जप्त करून अमेरिकेने हे विमान फ्लोरिडाकडे नेले आहे.
अमेरिकेने वेनेझुएलावर लादलेल्या निर्बंधांच्या भंग करून हे विमान आयात करण्यात आले होते आणि बेकायदेशीरपणे खरेदी करण्यात आले होते. त्यामुळे अमेरिकेने ही कारवाई केली आहे. अमेरिकेचे ॲटर्नी जनरल मेरिट बी. गारलँड यांनी या घटनेचे गांभीर्य अधोरेखित केलेले आहे.
ते म्हणतात अमेरिकेच्या निर्बंधांचे जो उल्लंघन करेल आणि अमेरिकेच्या साधन स्त्रोतांचे वापर करेल त्याला अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेचा विचार करून कारवाई करण्यात येईल. व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मदुरो यांच्याशी संबंधित शेल कंपनीने हे विमान बेकायदेशीरपणे खरेदी केले होते. कॅरेबियन बेटांवर या शेल कंपनीची नोंदणी करण्यात आली होती आणि नंतर हे विमान कॅरेबियन बेटावरून व्हेनेझुएललाला नेण्यात आले होते.
हे विमान अमेरिकेच्या अध्यक्षांसाठी वापरण्यात येणाऱ्या एअर फोर्स वन च्या समक्ष मानले जाते हे विमान मधुरो आणि वेनेज्वालातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना देशांतर्गत प्रवासासाठी आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी वापरले जात होते परिच्छेद डॉ सॉल्ट फाल्कन 900ex हे विमान 1984 मध्ये डॉ सॉल्ट कंपनीने प्रवासासाठी तयार केलेले आहे.
अनेक देशांच्या सरकारांकडून दीर्घ प्रवासासाठी या विमानाचा वापर केला जातो जपान कोस्टगार्ड फ्रेंच एअर अँड स्पेस फोर्स कडून अशा प्रकारची विमाने वापरली जातात व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांसाठीच निर्माण हे वेनेजुएलाच्या लष्करी तळावर उभे करण्यात येत होते आणि तेथून ते अध्यक्षांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी वापरले जात होते.
या विमानाची लांबी 66.4 फूट आणि याच्या पंखाची लांबी 63.4 फूट आहे हे विमान जास्तीत जास्त 482 नोट्स वेगाने म्हणजेच ताशी 555 मैल वेगाने प्रवास करू शकते. व्हेनेझुएलाचे हे विमान डोमेनिकॉन रिपब्लिक मध्ये आलेले असताना अमेरिकेच्या सरकारने स्थानिक सरकारच्या सहकार्याने विमान जप्त करण्याची कारवाई केली.





