Kerala : केरळमध्ये ‘PFI’च्या अनेक ठिकाणांवर ‘NIA’चे छापे

नवी दिल्ली – “पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेच्या आणि या संघटनेशी संबंधित अन्य संघटनांशी संबंधित सुमारे 56 ठिकाणांवर आज राष्ट्रीय तपास संस्था “एनआयए’ने छापे घातले. हे सर्व छापे ( NIA raids multiple locations linked to PFI in Kerala) केरळमधील 12 जिल्ह्यांमधील प्रांतीय कार्यकारी कमिटी सदस्य आणि विभागीय प्रमुखांच्या निवासस्थानांवर घालण्यात आले. याशिवाय 15 शारीरिक शिक्षण प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि 7 प्रशिक्षित उमेदवारांच्या निवासस्थानांवरही छापे घालण्यात आले. या उमेदवारांना चाकू, खंजीर, तलवार आणि अन्य प्रकराची शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. असे “एनआयए’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
या छापासत्रात अन्य 20 संशयितांच्या ठिकाणांवरही छापे घालण्यात आले. एर्नाकुलममध्ये 13, कन्नूरमध्ये नऊ, मलप्पुरममध्ये सात, वायनाडमध्ये सहा, कोझिकोडमध्ये चार, त्रिवेंद्रममध्ये प्रत्येकी तीन, कोल्लम, पठानमथिट्टा आणि अलप्पुझामध्ये प्रत्येकी तीन, त्रिशूर आणि कोट्टायममध्ये प्रत्येकी दोन आणि पलक्कडमध्ये एका ठिकाणी छापे घालण्यात आले, असे “एनआयए’च्या प्रवक्त्याने सांगितले.
या छाप्यांदरम्यान धारदार शस्त्रे, गुन्हेगारी स्वरुपाचे साहित्य आणि डिजीटल उपकरणे जप्त करण्यात आली. “पीएफआय’च्या माध्यमातून दहशतवादी उद्देशांसाठी गुन्हेगारी कारवायांसाठी युवकांना चितावणी दिली जात असल्याचे उघड झाले आहे, असेही “एनआयए’ने म्हटले आहे.
जलजीवन मिशन कार्यक्रमाला गती देण्यासाठी 1 हजार 313 नवीन पदे निर्माण करणार – पाणीपुरवठा मंत्री पाटील
“पीएफआय’च्या विरोधात 19 सप्टेंबर रोजी आणि त्यानंतर 3 दिवसांनी “एनआयए’ने सेवतःहून प्रकरण दाखल करून गेतले आहे. केरळमधील “पीएफआय’च्या कार्यालयांसह आरोपींच्या 13 निवासस्थानीही “एनआयए’ने छापे घातले आहेत. सप्टेंबरमध्ये या संघटनेच्या 15 राज्यांमधील काही वरिष्ठ नेत्यांच्या निवासस्थानी “एनआयए’ने छापे घातले आहेत.





