पुढील वर्षात विकास दर होणार ‘एवढे’ टक्के – FITCH
Updated On:

मुंबई – चालू आर्थिक वर्षात म्हणजे एप्रिल 2020 ते मार्च 2021 या काळात भारताचा विकास दर उणे 9.4 टक्के होणार आहे. 1952 नंतर भारताचा विकासदर एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच कमी होत आहे.
मात्र पुढील आर्थिक वर्षात म्हणजे एप्रिल 2021 ते मार्च 2022 मध्ये विकास दर वाढून 11 टक्के होईल, असे फिट्च या जागतिक पतमानांकन संस्थेने म्हटले आहे. मात्र त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेला हा उच्च विकास दर कायम ठेवता येणार नाही. तो सात टक्क्यापेक्षा कमी राहील असा दावा या संस्थेने केला आहे.





