Satara : सहकारी संस्था व शेतकऱ्यांना पाणीपट्टी भरण्यास २० मार्चपर्यंत मुदतवाढ
Updated On:

सातारा : कोयना सिंचन विभाग कोयनानगर विभागांतर्गत कोयना, तारळी, उत्तरमांड, उत्तरवांग, वांग नदी, मध्यम प्रकल्प व ल.पा. तलावांवर पाणी परवाना व विद्युत उपसा यंत्र परवाना मंजुरी घेणाऱ्या सातारा जिल्हयातील पाटण, कराड, सातारा तालुक्यातील, सातारा जिल्हयातील कराड व पाटण तालुक्यातील सर्व लाभधारक, बागायतदारांचे, ग्राहकांचे पाणी परवाने व विद्युत उपसा यंत्र परवाने मे २०२४ अखेर कार्यान्वित झालेले नाहीत असे पाणी परवाने व विद्युत उपसा यंत्र परवाने रद्द करण्यात येणार आहेत.
तसेच शेतकरी, लाभार्थ्यांना ७/१२ व खाते उतारे मिळण्यास व पाणीपट्टी भरण्यास कमी कालावधी मिळाल्याचे काही सहकारी संस्था व शेतकऱ्यांच्या विनंतीवरुन दि. २० मार्च २०२५ अखेर मुदतवाढ देण्यात येत आहे, अशी माहिती कोयना सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी दिली आहे.





