‘खबर छुपाई जाती है, अफवाह उड़ाई जाती है’; शरद पवारांच्या ‘त्या’ विधानावरून सदाभाऊ खोत यांची टीका

Sadabhau Khot Vs Sharad Pawar| महायुती सरकाला विधानसभा निवडणुकीत एक हाती सत्ता मिळाली. त्यानंतर विरोधकांकडून ईव्हीएम प्रक्रियेवर संशय घेण्यात आला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील मतदार यादीत घोळ झाल्याचे सांगत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूरमध्ये एक धक्कादायक विधान केलं आहे
‘विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्याला दोनजण भेटले होते. विधानसभेच्या 288 जागांपैकी 160 जागांची गॅरंटी त्यांनी दिली होती’, असं मोठे विधान शरद पवार यांनी केला आहे. त्यांच्या या विधानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत.
सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांना टोला
यातच आता विधान परिषदेचे आमदार रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. सदाभाऊ खोत यांनी एक्स वर पोस्ट करत ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांना हा टोला लगावला आहे. Sadabhau Khot Vs Sharad Pawar|
‘खबर छुपाई जाती है, अफवाह उड़ाई जाती है…जनतेनं नाकारलेले नेते आता लोकशाहीच्या छातीत खंजीर खुपसत आहेत. पवार साहेब, खरं असेल तर इतके दिवस गप्प का बसलात? की स्क्रिप्ट आता मिळाली?’ असा खोचक सवाल सदाभाऊ खोत थेट शरद पवार यांना विचारला आहे. दरम्यान, शरद पवार यांनी सांगितलेली दोन जण नेमके आहेत कोण? त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे? अस अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. Sadabhau Khot Vs Sharad Pawar|
राहुल गांधींना भेटल्यावरच याची आठवण का आली? – फडणवीस
शरद पवार यांच्या विधानावर मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, “मला हे लक्षात येत नाही की, पवार साहेबांना राहुल गांधींना भेटल्यावरच याची आठवण का आली? राहुल गांधी अनेक वर्षे ईव्हीएम बद्दल बोलत होते. तरी शरद पवार आतापर्यंत कधीच बोलले नव्हते. किंबहुना शरद पवार साहेबांनी अनेकवेळा स्पष्ट भूमिका घेतली होती की, ईव्हीएमला दोष देणे अयोग्य आहे.”
“आता अचानक बोललेत म्हणजे राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसत आहे. राहुल गांधी ज्याप्रमाणे सलीम जावेदच्या कहाण्या तयार करुन त्यांच्या स्क्रिप्टवर रोज कपोलकल्पित कहाण्या सांगत आहेत, तशाचप्रकारची अवस्था पवार साहेबांची झाली नाही ना?” असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला.
हेही वाचा :
मोठा अनर्थ टळला ! एअर इंडियाचे विमान अपघातातून थोडक्यात बचावले ; अनेक खासदार करत होते प्रवास





