जुन्नर तालुक्यातील राजुरीत आढळला करोना संशयित

तपासणीसाठी रुग्णाची रवानगी नायडू हॉस्पिटलमध्ये
बेल्हे :- राजुरी (ता.जुन्नर) येथे करोना संशयित रुग्ण आढळल्याने आमदार अतुल बेनके यांनी राजुरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली.संबंधित रुग्ण मुंबई वरून आला असून सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे दिसून आल्याने शनिवार (दि.२८) रोजी रात्री पुणे येथील नायडू हॉस्पिटल मध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. राजुरी येथे आमदार अतुल बेनके बोलताना म्हणाले की आळे, कोळवाडी, संतवाडी, उंचखडक, राजुरी,बेल्हे गुंजाळवाडी, गुळुंचवाडी,बोरी ही गावे खबरदारी म्हणून बफर झोन म्हणून घोषित करत आहोत.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1172415223098181/
तसेच याठिकाणी सीआरपीएफचे जवान सोमवारपासून तैनात करण्यात येणार आहेत. मुंबई – पुणे वरून येणारे नागरिक या ठिकाणी इतरत्र फिरताना दिसत आहेत.मोकाट फिरणारांना आमदारांनी विनंती केली की कुठेही फिरू नका,घरांमध्येच राहा,विनाकारण गर्दी करू नका तसेच शेतीवर काम करण्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांनी जाऊ नये असेही विनंती बेनके यांनी केले आहे.
हा रुग्ण संशयित असून टेस्टचा रिझल्ट येणे बाकी असून खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी आपण बफर झोन जाहीर करत असल्याचे बेनके यांनी सांगितले. या भागातील नागरिकांना आता घराबाहेर पडण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली असून नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे तसेच कोणत्याही अफवा पसरू नयेत असे बेनके यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.





