वाई : 51 ग्रामपंचायतींमध्ये महिलांना संधी; मातबरांचे मनसुबे ‘उद्‌ध्वस्त’

वाई – वाई तालुक्‍यातील 99 ग्रामपंचायतींमधील सरपंचपदांच्या आरक्षणाची सोडत शुक्रवारी झाली. ही सोडत तहसीलदार कार्यालयात ग्रामस्थांसमोर जाहीर करण्यात आली. महिलांना 50 टक्के आरक्षण असल्याने 51 ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंच होणार आहेत. राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या गावांमध्ये सरपंचपदे आरक्षित झाल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या मातबरांचे मनसुबे उद्‌ध्वस्त झाले आहेत.

वाई तालुक्‍यातील 99 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यातील 23 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने 76 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. निवडणूक निकालाचा धुरळा खाली बसत असतानाच, वाई येथील तहसील कार्यालयात आज सरपंचपदांची आरक्षण सोडत राजकीय पक्षांचे प्रमुख नेते व ग्रामस्थांच्या उपस्थितीत काढण्यात आली.

त्यामध्ये राजकीयदृष्ट्या संवेदनशील बावधन, पसरणी, सुरूर, खानापूर, वेळे, विरमाडे, मेणवली, चिंधवली, काळगवाडी, उडतारे, यशवंतनगर, व्याजवाडी, शेंदुरजणे, पांडे, एकसर, शिरगाव, चिखली, कवठे, परखंदी, अभेपुरी यासह अन्य काही गावांमध्ये अनुसूचित जातीजमाती, ओबीसी व खुल्या प्रवर्गातील महिलांना सरपंचपदे मिळाली आहेत.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 2011 च्या जनगणनेवर आधारित, लोकसंख्येच्या टक्केवारीप्रमाणे उतरत्या क्रमानुसार यापूर्वी झालेले आरक्षण वगळता सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. सर्वप्रथम महिला आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यामध्ये अनुसूचित जाती पाच, अनुसूचित जमाती एक, ओबीसी 14, सर्वसाधारण 31, अशा 51 गावांमध्ये महिलांना आरक्षण मिळाले आहे. अनुसूचित जातीसाठी नऊ गावांचे आरक्षण पडले.

त्यातील बावधन, वेळे, सुरूर, खावली, गोवेदिगर येथे या प्रवर्गातील महिला आणि केंजळ, बोरीव-व्याहळी, पसरणी, अनवडी येथे अनुसूचित जातीसाठी खुले आरक्षण झाले आह. खडकी येथे अनुसूचित जमातीतील महिला व ओझर्डेत अनुसूचित जमाती खुला, असे आरक्षण पडले. विरमाडे, बालेघर, मेणवली, वाघजाईवाडी, सुलतानपूर, नागेवाडी, आसरे, धोम (पु.), वरखडवाडी, चांदवडी (पु.), काळगवाडी, मुंगसेवाडी, चिंधवली, निकमवाडी या ग्रामपंचायतींमध्ये ओबीसी महिलांना संधी मिळाली, तर भुईंज, धावडी, देगाव, भोगाव, अमृतवाडी, किरुंडे, किकली, गोळेगाव, शहाबाग, शेलारवाडी, वयगाव, वाशिवली, गुळुंब येथे ओबीसी खुला असे आरक्षण पडले आहे.

उर्वरित 61 ग्रामपंचायतींमध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यातील 31 ग्रामपंचायतींमध्ये सर्वसाधारण महिला व 30 ग्रामपंचायतींमध्ये सर्वसाधारण खुला, असे आरक्षण पडले आहे. अभेपुरी, आसले, आकोशी, बेलमाची, चांदक, चिखली, जांभळी, कवठे, पांडे, कुसगाव, कळंबे, खानापूर, परखंदी, रेणावळे, उळुंब, शिरगाव, उडतारे, वहागाव, यशवंतनगर, अनपटवडी, एकसर, जोर, कोंढवली, ओहळी, वेरुळी, वेलंग, व्याजवाडी, मुगाव,दह्याट, भिवंडी (पु.), शेंदुरजणे या ग्रामपंचायतींमध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांना आरक्षण मिळाले आहे.

बोपर्डी, बोपेगाव, बोरगाव, चोराचीवाडी, धोम, जांब, कणूर, कडेगाव, कोंढावळे, खोलवडी, लोहारे, मालतपूर, मांढरदेव, मोहडेकरवाडी, नांदगणे, परतवडी, पाचवड, वासोळे, पांडेवाडी, पांढरेचीवाडी, राऊतवाडी, सटालेवाडी, वडवली, व्याहळी (पु.), विठ्ठलवाडी, दसवडी, दरेवाडी, गाढवेवाडी, गुंडेवाडी, लगडवाडी येथे खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.