साडेतीन लाख पुऱ्या.. पाच पिंप गुळवणी.. 10 क्विंटल कांद्याची चटणी..; ग्रामस्थांनी शेकडो वर्षांची परंपरा ठेवली टिकवून

Updated On:
साडेतीन लाख पुऱ्या.. पाच पिंप गुळवणी.. 10 क्विंटल कांद्याची चटणी..; ग्रामस्थांनी शेकडो वर्षांची परंपरा ठेवली टिकवून

मंचर – थोरांदळे (ता. आंबेगाव) येथिल ग्रामदैवत हनुमान जन्मोत्सवानिमित्त तब्बल ११ पोती गव्हाच्या साडेतीन लाखाहून अधिक पुऱ्या, पाच पिंप गुळवणी, व १ हजार किलो कांद्याची चटणी असा महाप्रसाद बुधवारी (दि. ५) रोजी तयार झाला आहे. शेकडो वर्षापासून सुरु असलेल्या पुऱ्या गुळवणीच्या महाप्रसादाची थोरांदळे ग्रामस्थांची परंपरा आजही टिकवून ठेवली आहे.

बेल्हा ते मंचर रस्त्यावर थोरांदळे गाव आहे. येथील ग्रामदैवत हनुमानाचे जागृत देवस्थान आहे. ग्रामस्थ दरवर्षी हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त पुर्‍या – गुळवणीचा महाप्रसाद उपस्थित भाविकांना वाटला जातो. ही परंपरा ग्रामस्थांनी आजही टिकून ठेवली आहे. यंदा तब्बल ११ पोती गव्हाच्या साडेतीन लाखाहून अधिक पुऱ्या, पाच पिंप गुळवणी व एक हजार किलो कांद्याच्या चटणीचा महाप्रसाद ग्रामस्थांनी तयार केला आहे.

बुधवारी रात्री उशिरापर्यंत हा ‘पुर्‍या गुळवणीचा’ महाप्रसाद तयार करण्याचे काम सुरु राहणार आहे. गुरुवारी(दि. ६ ) रोजी पहाटे पाच ते सात ह.भ. प. नंदू महाराज सोनवणे (रांजणी) यांचे हनुमान जन्माचे व काल्याचे किर्तन होणार आहे. त्यानंतर मांडव डहाळे व शेरणी मिरवणूक होऊन उपस्थित भाविक भक्त, पाहुण्यांना पुऱ्या गुळवणीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक भक्तांप्रमाणेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून देखील भाविक भक्त उपस्थित असतात. असे श्री मारुती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्रीराम टेमगिरे आणि उपाध्यक्ष नितीन मिंडे यांनी सांगितले.

महाप्रसादासाठी यंदा गावातील प्रत्येक घरातून मानसी एक आठवा व उंबऱ्यामागे चार आठवे गहू गोळा केला. तो ११ पोती गहू एकत्र करून पुन्हा घरोघरी वाटला. सकाळी ११ वाजल्यापासून गावातील वाडी – वस्त्या मळ्यांमधिल महिलांनी गावात येऊन हनुमान मंदिरासमोरील ओट्यावर येऊन पुऱ्या लाटण्याचे काम सुरु केले.

या महिलांनी तब्बल साडे तीन लाखाहून अधिक पुऱ्या लाटल्या. गावातील तरुणांनी या पुऱ्या तळण्याचे काम केले. तर जेष्ठ नागरिकांनी चटणीच्या कांदा चिरण्याचे काम केले, अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या प्रमिला टेमगिरे आणि देवस्थान ट्रस्टचे सचिव संदिप टेमगिरे यांनी दिली.

आणखी संबंधित बातम्या

Pune News : करमोळीत पारंपरिक पद्धतीने हनुमान जन्मोत्सव साजरा

2026-04-02 19:05:28

Pune News : करमोळीत पारंपरिक पद्धतीने हनुमान जन्मोत्सव साजरा

Ramayan Movie : रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटाबद्दल मोठे अपडेट; 'या' खास दिवशी समोर येणार भगवान श्रीरामाची झलक

2026-03-27 15:58:06

Ramayan Movie : रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटाबद्दल मोठे अपडेट; 'या' खास दिवशी समोर येणार भगवान श्रीरामाची झलक

"आरोप सिद्ध करा, नाहीतर मीच गुन्हा दाखल करणार"; त्या व्हायरल व्हिडिओवरून मेधा कुलकर्णींचे थेट आव्हान

2025-04-18 12:45:01

"आरोप सिद्ध करा, नाहीतर मीच गुन्हा दाखल करणार"; त्या व्हायरल व्हिडिओवरून मेधा कुलकर्णींचे थेट आव्हान

नेपाळमध्ये हनुमान जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान हिंसाचार ; कर्फ्यूमुळे सीमा सील

2025-04-13 11:28:56

नेपाळमध्ये हनुमान जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान हिंसाचार ; कर्फ्यूमुळे सीमा सील

मेगास्टार चिरंजीवीचं हनुमान जयंती दिवशी चाहत्यांना सरप्राईज; विश्वभंरा चित्रपटातील 'रामा रामा' गाणं रिलीज

2025-04-12 13:21:10

मेगास्टार चिरंजीवीचं हनुमान जयंती दिवशी चाहत्यांना सरप्राईज; विश्वभंरा चित्रपटातील 'रामा रामा' गाणं रिलीज