Ramayan Movie : रणबीर कपूरच्या ‘रामायण’ चित्रपटाबद्दल मोठे अपडेट; ‘या’ खास दिवशी समोर येणार भगवान श्रीरामाची झलक
‘रामायण’ हा केवळ चित्रपट नसून भारतीय संस्कृती आणि श्रद्धेचं जागतिक पातळीवर भव्य सादरीकरण ठरणार असल्याचं मानलं जात आहे.

Ramayan Movie : भारतीय चित्रपटसृष्टीतील 2026 मधील सर्वात बहुप्रतिक्षित आणि भव्य प्रकल्पांपैकी एक असलेल्या ‘रामायण’ चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. भगवान श्रीरामाच्या भूमिकेतील पुढील झलक 2 एप्रिल हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर जागतिक स्तरावर प्रदर्शित केली जाणार असल्याची घोषणा चित्रपटाच्या निर्मात्यांनी केली आहे. या निमित्ताने जगभरातील चाहत्यांसोबत खास सेलिब्रेशनही आयोजित करण्यात येणार आहे.
रामनवमीला निर्मात्यांची अधिकृत घोषणा : Ramayan Movie
रामनवमी निमित्त नमित मल्होत्रा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या भव्य अनावरणाची माहिती दिली. त्यांनी लिहिले की, ‘रामायण ही प्रत्येक भारतीयाची कथा आहे. हा चित्रपट पूर्ण श्रद्धा, जबाबदारी आणि समर्पणाने तयार केला जात असून त्याची भव्यता आणि भावना प्रामाणिकपणे प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न आहे.’ तसेच हनुमान जयंतीच्या दिवशी ‘राम’ची नवी झलक जगभरात एकाच वेळी दाखवली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
चित्रपटाचा फर्स्ट लुक याआधी भारतासह जगातील अनेक शहरांमध्ये दाखवण्यात आला होता. विशेष म्हणजे न्यूयॉर्कमधील Times Square येथेही ‘रामायण’ची झलक प्रदर्शित करण्यात आली होती, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रपटाची मोठी चर्चा रंगली.
दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार चित्रपट : Ramayan Movie
दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि मोठ्या बजेटमध्ये तयार होत आहे. चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. भाग 1: दिवाळी 2026 मध्ये येणार असून भाग 2: दिवाळी 2027 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
दमदार स्टारकास्ट : Ramayan Movie
रणबीर कपूर — भगवान श्रीराम
साई पल्लवी — माता सीता
यश — रावण
सनी देओल — भगवान हनुमान
रवि दुबे — लक्ष्मण
रणबीर कपूर :
बॉलीवूडमधील बहुगुणी अभिनेता म्हणून ओळखले जाणारे रणबीर कपूर यांनी Rockstar, Sanju, Brahmāstra सारख्या चित्रपटांत दमदार भूमिका साकारल्या आहेत. श्रीरामाची भूमिका साकारण्यासाठी त्यांनी विशेष शारीरिक आणि मानसिक तयारी केल्याची माहिती समोर आली आहे.
साई पल्लवी
दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील नैसर्गिक अभिनयासाठी प्रसिद्ध अभिनेत्री. साधेपणा आणि प्रभावी अभिनयामुळे त्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरतात.
यश
KGF मालिकेमुळे जागतिक स्तरावर लोकप्रिय झालेले अभिनेता यश या चित्रपटात रावणाची शक्तिशाली भूमिका साकारताना दिसणार आहेत.
सनी देओल
ॲक्शन आणि दमदार संवादासाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अभिनेते. हनुमानाच्या भूमिकेत त्यांची निवड विशेष चर्चेचा विषय ठरली आहे.
एकूणच, ‘रामायण’ हा केवळ चित्रपट नसून भारतीय संस्कृती आणि श्रद्धेचं जागतिक पातळीवर भव्य सादरीकरण ठरणार असल्याचं मानलं जात आहे. आता हनुमान जयंतीला प्रदर्शित होणाऱ्या नव्या झलककडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.







