ऑलिम्पिकबाबत इतक्यात निर्णय नाही
Updated On:

टोकियो – ऑलिम्पिक स्पर्धेला खूप कालावधी आहे, त्यामुळे इतक्यात या स्पर्धेच्या भवितव्याबाबत कोणताच निर्णय घाईने घेण्याची आवश्यकता नाही, असे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओए) स्पष्ट केले आहे.
ऑलिम्पिक स्पर्धा जुलैमध्ये होत आहे. अद्याप स्पर्धेला बराच कालावधी आहे. इतक्यात स्पर्धेबाबत निर्णय घेणे योग्य नाही. सध्यातरी वेट ऍण्ड वॉच अशी आमची भूमिका आहे, असेही आयओएने नमूद केले आहे. करोनाचा धोका वाढत आहे, त्यामुळे सध्यातरी ऑलिम्पिकचा विचार सोडून द्या व स्पर्धा पुढे ढकला अशी मागणी खुद्द जपानमध्येच जोर धरत आहे.





