Rajya Sabha : मोठी बातमी ! राज्यसभेसाठी राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब?; पुतण्याला मंत्रिपदाचीही चर्चा
Rajya Sabha : राज्यसभेच्या उमेदवारीसह समीर भुजबळ यांना मंत्रिपदाची संधी मिळणार का, याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून होणाऱ्या अधिकृत घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Rajya Sabha : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची घोषणा होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्य मंत्रिमंडळात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या राजीनाम्यामुळे ही जागा रिक्त झाली असून, त्यासाठी भुजबळ हे सुरुवातीपासूनच प्रमुख दावेदार मानले जात होते.
राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते भुजबळ यांच्या निवासस्थानी – (Rajya Sabha)
शनिवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या हालचालींना वेग आला. खासदार पार्थ पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल आणि छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते थेट भुजबळ यांच्या निवासस्थानी दाखल झाल्याने राज्यसभा उमेदवारीबाबत अंतिम निर्णय झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
गेल्या दोन दिवसांत भाजप नेत्या नवनीत राणा यांचे नावही राज्यसभेसाठी चर्चेत आले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली होती. मात्र, शनिवारी झालेल्या बैठकीनंतर छगन भुजबळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अधिक बळावली आहे.
हेही वाचा – ठाकरे गटाचा बडा नेता ACBच्या रडारवर; काय आहे प्रकरण जाणून घ्या…
समीर भुजबळांना राज्यात मंत्रिपद ? (Rajya Sabha)
दरम्यान, छगन भुजबळ यांची राज्यसभेवर नियुक्ती झाल्यास राज्यातील त्यांच्या मंत्रिपदाचा आणि आमदारकीच्या जागेचा प्रश्नही महत्त्वाचा ठरणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भुजबळ यांनी आपल्या जागी कुटुंबातील सदस्य समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळात संधी देण्याची भूमिका पक्ष नेतृत्वासमोर मांडली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याचे समजते.
राज्यसभेच्या उमेदवारीसह समीर भुजबळ यांना मंत्रिपदाची संधी मिळणार का, याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून होणाऱ्या अधिकृत घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी काही तासांत या संदर्भात महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यसभा महाराष्ट्र पोटनिवडणूक कार्यक्रम – (Rajya Sabha)
अधिसूचना जारी (Notification): १ जून २०२६
नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख: ८ जून २०२६
नामांकन अर्जांची छाननी: ९ जून २०२६
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत: ११ जून २०२६
मतदान आणि मतमोजणी : १८ जून २०२६





