Kolhapur: ‘2024ला भाजप आणि मोदी सरकारसोबत असलेल्यांच्या हातून सत्ता काढून घ्या’; शरद पवारांच्या निर्धार सभेतील महत्वाचे 10 मुद्दे

Updated On:
Kolhapur: ‘2024ला भाजप आणि मोदी सरकारसोबत असलेल्यांच्या हातून सत्ता काढून घ्या’; शरद पवारांच्या निर्धार सभेतील महत्वाचे 10 मुद्दे

कोल्हापूर – पुढील वर्षी 2024 हे वर्ष निवडणुकीचं वर्ष आहे. तुम्हाला अधिकार आहे. भाजप आणि मोदी सरकारसोबत असलेल्यांची सत्ता काढून घ्या आणि चांगले काम करणाऱ्यांच्या हातात सत्ता द्या, असे विधान राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शरद पवार यांनी कोल्हापूरातील निर्धार सभेत केले. तसेच यावेळी त्यांनी महागाई, ईडीची कारवाई, कांद्याचा प्रश्न, बेरोजगारी, मणिपूरची स्थिती अशा विविध विषयांवर भाष्य करत भाजप सरकारवर जोरदार टीका केली. त्यांच्या भाषणातील काही महत्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे…

-कोल्हापूर देशाला दिशा दाखवणारी नगरी, छत्रपती शिवरायांचं राज्य हे रयतेचं राज्य, मला जन्म देणारी माता कोल्हापूरची, छत्रपतींचं राज्य हे भोसल्यांचं नव्हतं, रयतेचं होतं, शाहू महाराजांनी चुकीच्या गोष्टींना कधीही पाठिशी घातलं नाही.

– इस्त्रोची जगात कामगिरी उत्तम, त्यांचं अभिनंदन करणं ही आपली सर्वांची जबाबदारी, इस्त्रोची स्थापना जवाहरलाल नेहरूंनी केली, नेहरू, कलाम, वाजपेयी, मोदींमुळे इस्त्रोला यशं, एका ठिकाणी आपण चंद्रावर, दुसरीकडे महागाई

-जिल्ह्यात 24 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. हे चांगलं नाही. शेतीमालाला किंमत देत नाहीत. त्यांच्या डोक्यावर कर्ज होतंय. शेतकरी शेवटी नाविलाजानं आत्महत्या करतो, तरूण-तरूणींसमोर बेरोजगारीचं संकट

-मोदी सरकारनं कांद्यावर 40 टक्के निर्यातकर बसवला, कृषीमंत्री असताना मी कांद्यावर कर लावला नाही, आंदोलन करूनही सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही, शेतकऱ्यांनी कडक उन्हात, थंडीत आंदोलन केलं. कुटुंबासह दिल्लीच्या सीमेवर बसले. पण मोदी सरकार आणि त्यांचे सहकारी त्यांच्याकडे डुंकूनही पाहिले नाही. शेतकऱ्यांचा अपमान मोदी सरकारने केला आहे. लोक महागाई, बेरोजगारीने ग्रासले आहेत.

-मणिपूर, नागालॅंड, सिक्किम, अरूणाचल या राज्यात काय परिस्थिती आहे. आयाबहिनींची धिंड काढली जाते. तरीसुद्धा यांच्या हातात सत्ता आहे. पण हे त्या भगिणींना वाचवण्याचा प्रयत्न करत नाहीत. आज आयाबहिनींची इज्जत सांभाळण्याची ज्या सरकरामध्ये ताकद नाही त्यांना सत्तेत बसण्याचा अधिकार नाही.

– महाराष्ट्रातील कारखाने गुजरातमध्ये हलवले. मोदी हे देशाचे पंतप्रधान नाहीत तर ते त्यांच्या राज्याचा विकास करत आहेत. त्यांचं देशापेक्षा गुजरातकडे जास्त लक्ष आहे.

– सत्तेचा वापर विरोधी पक्षांना त्रास देण्यासाठी केला जातोय. भाजप मध्ये न येणाऱ्यांना तुरूंगात टाकलं जात आहे. संजय राऊतांना तुरूंगात टाकलं. ईडीच्या नोटीसीमुळे काही जणांनी भूमिका बदलली. कोल्हापूरात एकाला ईडीची नोटीस आली आणि त्यांनी भूमिका बदलली.

– नवाब मलिक सरकारच्या चुकीच्या गोष्टींवर टीका करत होते. त्यांना तुरूंगात टाकलं. मलाही ईडीची नोटीस आली. बॅंकेच्या व्यवहारासाठी मला नोटीस आली पण त्या बॅंकेशी माझा काहीही संबंध नव्हता. काहीही नसताना फक्त ईडीची भीती घालण्यासाठी मला नोटीस आली.

– सर्वसामान्यांवर अन्याय करणाऱ्या अशा सरकारला धडा शिकवला पाहिजे, 2024 हे निवडणुकीचं वर्ष आहे. तुम्हाला अधिकार आहे. तुमच्यावर झालेल्या अन्यायाचा विचार करा आणि भाजप आणि भाजपच्या बरोबर असलेल्यांची सत्ता काढून चांगले काम करणाऱ्यांच्या हातात द्या.

आणखी संबंधित बातम्या

Sharad Pawar on Nana Patekar : ‘एक असामान्य पर्व संपलं...’; नाना पाटेकरांच्या निधनाने शरद पवार भावुक, म्हणाले- ‘अमिट छाप सदैव स्मरणात राहील’

2026-10-08 09:23:00

Sharad Pawar on Nana Patekar : ‘एक असामान्य पर्व संपलं...’; नाना पाटेकरांच्या निधनाने शरद पवार भावुक, म्हणाले- ‘अमिट छाप सदैव स्मरणात राहील’

Sharad Pawar: "माझं मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलणं झालंय!" एमपीएससी आंदोलनावर शरद पवारांची मोठी मध्यस्थी

2026-10-05 06:45:02

Sharad Pawar: "माझं मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलणं झालंय!" एमपीएससी आंदोलनावर शरद पवारांची मोठी मध्यस्थी

Sharad Pawar: जिरायती भाग शंभर टक्के बागायत करता आला नाही, याची खंत : शरद पवार

2026-10-03 13:14:18

Sharad Pawar: जिरायती भाग शंभर टक्के बागायत करता आला नाही, याची खंत : शरद पवार

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बारामती दौऱ्याच्या तारखेत बदल; शरद पवारांनी दिली माहिती

2026-10-03 12:02:53

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बारामती दौऱ्याच्या तारखेत बदल; शरद पवारांनी दिली माहिती

Mahadev Jankar : "गोकुळ दूध संघाच्या खाजगीकरणासाठी मला दोनशे कोटी रुपयांची ऑफर आली होती"; महादेव जानकरांचा गौप्यस्फोट

2026-10-03 07:49:09

Mahadev Jankar : "गोकुळ दूध संघाच्या खाजगीकरणासाठी मला दोनशे कोटी रुपयांची ऑफर आली होती"; महादेव जानकरांचा गौप्यस्फोट