कार्यकर्ता पडला तरीही ज्योतिरादित्य शिंदे सुसाट; समोर आलं पळण्याचं कारण

नवी दिल्ली – केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्यासोबत त्यांचे अनेक कार्यकर्ते धावत असल्याचे दिसते आहे. त्यातच एक कार्यकर्ता खाली पडतो. यावेळी शिंदे त्याच्याकडे पाहूनही न थांबता सुसाट धावत असल्याचे दिसते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तो कुठला आहे? शिंदे का धावत आहेत? असा अनेकांना प्रश्न पडला आहे.
हा व्हिडीओ व्हायरल होताच त्यावर नेटिझन्सकडून संमीश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही उत्सुक मंडळींनी यावर मजेदार मीम्सही बनवले आहेत. दरम्यान हा व्हिडीओ ज्योतिरादित्य शिंदे ग्वाल्हेर दौऱ्यावर असतानाचा आहे. ग्वाल्हेर इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमच्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी शिंदे ग्वाल्हेरमध्ये आले होते. स्टेडियमच्या कामाची पाहणी करताना ते स्टेडियमच्या अधिकाऱ्यांसोबत आणि भाजपा कार्यकर्त्यांसोबत तिथे क्रिकेट देखील खेळले. यावेळी सर्वांसोबत त्यांनी धावण्याचा देखील सराव केला. यावेळी काढण्यात आलेला हा व्हिडीओ आहे. त्यांनी ग्वाल्हेर स्टेडियमच्या उद्घाटनावेळचे फोटो देखील त्यांच्या ट्विटर हँडलवर पोस्ट केले आहेत.
#WATCH | Union Minister Jyotiraditya Scindia inspected the under-construction Gwalior International Cricket Stadium in Shankarpur area of the district, on 9th Dec. During the inspection, the Minister played cricket with officials & party leaders-workers, & also sprinted with them pic.twitter.com/fIQ7MSE0yl
— ANI (@ANI) December 11, 2021
एकेकाळी राहुल गांधींच्या जवळच्या गोटातले समजले जाणारे ज्योतिरादित्य शिंदे यांनी गेल्या वर्षी मार्च महिन्यात भाजपामध्ये प्रवेश केला. राजस्थानमधली सत्तासमीकरणं आणि स्थानिक काँग्रेस नेतृत्वासोबत असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपाचा रस्ता धरला. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे नागरी हवाई वाहतुकीची जबाबदारी देण्यात आली आहे.
ग्वालियर में निर्माणाधीन अंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम का निरीक्षण किया।इस दौरान बल्ले से भी हाथ आज़माए। pic.twitter.com/yxoTOXGD3c
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) December 9, 2021





