India-UK FTA: भारत-यूके मुक्त व्यापार करार अखेर ‘या’ दिवशी लागू होणार!
India-UK FTA: भारत-यूके मुक्त व्यापार करार यावर्षी 15 जुलैपासून लागू होईल, असे वाणिज्य मंत्रालयाने बुधवारी सांगितले.

India-UK FTA: भारत-यूके मुक्त व्यापार करार यावर्षी 15 जुलैपासून लागू होईल, असे वाणिज्य मंत्रालयाने बुधवारी सांगितले. व्यापक आर्थिक आणि व्यापार करार गेल्या वर्षी 24 जुलै रोजी करण्यात आला होता. भारताच्या जागतिक आर्थिक सहभागासाठी एक मोठे पाऊल म्हणून, भारत आणि युनायटेड किंगडमने घोषणा केली की करार 15 जुलै 2026 रोजी लागू होईल, असे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
त्याचबरोबर, सामाजिक सुरक्षेवरील करार – ज्याला दुहेरी योगदान करार म्हणून ओळखले जाते तो देखील 15 जुलै रोजी लागू होईल, असेही त्यात म्हटले आहे. यामुळे दोन्ही देशादरम्यानचा व्यापार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. यातील सर्व अडथळे आता दूर झाले आहेत. भारत इतर अनेक देशाबरोबर अशा प्रकारचा करार करण्याचा प्रयत्न करीत आहे.


