Holi School Holiday: होळीनिमित्त शाळेला सुट्टी कधी? 2, 3 की 4 मार्च…. जाणून घ्या
Holi School Holiday: यंदा होळी 2 मार्च रोजी साजरी होणार असून, दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 मार्च, मंगळवारी रंगपंचमी (धुलीवंदन) निमित्त सार्वजनिक सुट्टी असेल.

Holi School Holiday: महाराष्ट्र शासनाने 2026 या वर्षासाठी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी 24 सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. यंदा होळी 2 मार्च रोजी साजरी होणार असून, दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 मार्च, मंगळवारी रंगपंचमी (धुलीवंदन) निमित्त सार्वजनिक सुट्टी असेल.
सध्या सुरू असलेल्या अधिवेशनालाही सुट्टी – Holi School Holiday
सध्या महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. मात्र 3 मार्च रोजी अधिवेशनाचे कामकाजही बंद राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या सुट्ट्या राज्यातील सर्व शासकीय कार्यालये, महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना लागू राहतील.
होळीनिमित्त वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या दिवशी सुट्टी –
दिल्लीतील शाळांना ४ मार्च रोजी सुट्टी असणार आहे. काही शाळांमध्ये ३ मार्च रोजी होळीसाठी सुट्टी असू शकते किंवा काही शाळांमध्ये अर्ध्या दिवसाची सुट्टी असू शकते. मध्य प्रदेशमध्ये २ आणि ३ मार्चला होळीच्या सुट्ट्या असणार आहेत. हरियाणा आणि पंजाबमध्ये ४ मार्चला होळीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बिहारमध्ये सहसा होळीच्या सुट्ट्या दोन दिवस असतात. ३ आणि ४ मार्च जोरी बिहारमध्ये शाळा बंद राहणार आहेत. राजस्थानमध्ये २ आणि ३ मार्चला शाळांना होळीची सुट्टी असणार आहे.
हेही वाचा – Samsung Galaxy S26 Ultra 5G भारतात लॉन्च; किंमत, फिचर्स जाणून घ्या सर्वकाही
मार्च महिन्यातील सार्वजनिक सुट्ट्या –
मार्च महिन्यात एकूण पाच सार्वजनिक सुट्ट्या आहेत — होळी (रंगपंचमी) 3 मार्च, गुढीपाडवा 19 मार्च, रमझान ईद 21 मार्च, रामनवमी 26 मार्च आणि महावीर जयंती 31 मार्च.
वर्षभरातील प्रमुख सुट्ट्या –
- होळी (दुसरा दिवस) – 3 मार्च 2026, मंगळवारगुढीपाडवा – 19 मार्च 2026, गुरुवाररमझान ईद – 21 मार्च 2026, शनिवाररामनवमी – 26 मार्च 2026, गुरुवार
महावीर जयंती – 31 मार्च 2026, मंगळवार
गुड फ्रायडे – 3 एप्रिल 2026, शुक्रवार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती – 14 एप्रिल 2026, मंगळवार
महाराष्ट्र दिन – 1 मे 2026, शुक्रवार
बुद्ध पौर्णिमा – 1 मे 2026, शुक्रवार
बकरी ईद – 28 मे 2026, गुरुवार
मोहरम – 26 जून 2026, शुक्रवार
स्वातंत्र्य दिन – 15 ऑगस्ट 2026, शनिवार
पारशी नववर्ष दिन – 15 ऑगस्ट 2026, शनिवार
ईद ए मिलाद – 26 ऑगस्ट 2026,बुधवार
गणेश चतुर्थी – 14 सप्टेंबर 2026, सोमवार
महात्मा गांधी जयंती – 2 ऑक्टोबर, 2026 शुक्रवार
दसरा – 20 ऑक्टोबर 2026,मंगळवार
दिवाळी (लक्ष्मीपूजन) – 8 नोव्हेंबर 2026, रविवार
दिवाळी (बलिप्रतिपदा) – 10 नोव्हेंबर 2026, मंगळवार
गुरुनानक जयंती 24 नोव्हेंबर 2026, मंगळवार
ख्रिसमस – 25 डिसेंबर 2026, शुक्रवार
भाऊबीजेची अतिरिक्त सार्वजनिक सुट्टी
भाऊबीजेची अतिरिक्त सुट्टी –
राज्य सरकारने यंदा भाऊबीज म्हणजे 11 नोव्हेंबर 2026 रोजी अतिरिक्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याचा निर्णयही घेतला आहे. त्यामुळे दिवाळीच्या काळात नागरिकांना सलग अधिक दिवस सण साजरा करता येणार आहे.




