Gokul Milk: गोकुळचं दुध महागलं; उद्यापासून दरवाढ लागू
Updated On:

मुंबई – गोकुळ दूधसंघाने दरवाढीची घोषणा केली आहे. खरेदी आणि विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय संघाने घेतला आहे. उद्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. त्यानुसार, ग्राहकांना आता प्रतिलिटर 2 रुपये जास्तीचे मोजावेल लागणार आहेत. मुंबईत दरवाढीनंतर गोकुळच्या एक लिटर दूधाची किंमत आता 66 रुपये झाली आहे.
दरम्यान, दूध खरेदी दरातही वाढ केल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. म्हशीच्या दूध खरेदी दरात दोन रुपयांची तर गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर एक रुपयाची वाढ करण्यात आली आहे.





