महासंघाच्या अध्यक्षपदाचे भुटियाचे लक्ष्य
Updated On:

नवी दिल्ली – भारताचा स्टार फुटबॉलपटू बायचुंग भुटिया याने भविष्यात अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सहभाग घेण्याची तयारी असल्याचे सांगितले आहे.
भारतीय फुटबॉलला जागतिक स्तरावर नवी ओळख निर्माण करुन देण्यात मोलाचा वाटा उचलणारा भुटिया जगातील अनेक स्टार खेळाडूंवरही प्रभाव पाडणारा ठरला होता. त्याच्या खेळाला ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्यासह अनेकांनी दाद दिली होती.
नेयमार, रोनाल्डो यांच्यापेक्षाही जास्त आंतरराष्ट्रीय गोल नोंदविलेल्या भुटियाबाबत आज जागतिक फुटबॉल क्षेत्रात अत्यंत आदराचे स्थान आहे. 2011 साली आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त झाल्यानंतर त्याने या खेळाचा समालोचक, सल्लागार तसेच प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे.
टॅग्स:





