Elephanta Boat Accident : बुडालेल्या बोटीतील 80 प्रवाशांना वाचवण्यात यश, एकाचा मृत्यू

मुंबई : गेट वे ऑफ इंडियापासून एलिफंटाकडे जाणारी नीलकमल नावाची एक प्रवासी बोट बुडाल्याची घटना मुंबईत घडली. या बोटीतील 80 प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. तर एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे.
देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया –
दरम्यान, या अपघात प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले, एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल या बोटीचा अपघात घडल्याचे वृत्त प्राप्त झाले. नौदल, कोस्टगार्ड, पोर्ट, पोलिस पथकच्या बोटी तातडीने मदतीसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. जिल्हा आणि पोलिस प्रशासनाशी सातत्याने आम्ही संपर्कात असून, सुदैवाने बहुसंख्य नागरिकांना वाचविण्यात आले आहे. तथापि अजूनही बचावकार्य सुरू आहे. बचावकार्यासाठी सर्व त्या यंत्रणा तैनात करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.
एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल या बोटीचा अपघात घडल्याचे वृत्त प्राप्त झाले. नौदल, कोस्टगार्ड, पोर्ट, पोलिस पथकच्या बोटी तातडीने मदतीसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. जिल्हा आणि पोलिस प्रशासनाशी सातत्याने आम्ही संपर्कात असून, सुदैवाने बहुसंख्य नागरिकांना वाचविण्यात आले आहे. तथापि अजूनही…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 18, 2024
अपघात कसा झाला ?
या अपघाताची दृश्य ही कॅमेरात कैद झाली आहेत. त्यामध्ये एक स्पीड बोट ही आधी मोठा राऊंड मारताना दिसत आहे. नतंर ही स्पीड बोट नीलकमल या बोटीला समोरून धडक मारते. त्यामुळेच हा अपघात झाला आहे. धडक मारणारी ही स्पीड बोट इंडियन नेव्हीची असल्याचे सांगितले जात आहे. ही बोट नेव्हीची असल्याची माहिती मिळाल्यानंतर इंडियन नेव्हीकडून त्याची चौकशी सुरू झाली आहे. दरम्यान, एलिफंटाकडे जात असताना उरण, कारंजाजवळ ही दुर्घटना घडली आहे.





