India Coronavirus : देशात गेल्या 24 तासात 39796 नव्या करोना केसेस; 723 जणांचा मृत्यू
Updated On:

नवी दिल्ली – देशात गेल्या 24 तासांत करोनाच्या एकूण 39 हजार 796 केसेस आढळून आल्या आहेत. याच अवधीत करोनामुळे एकूण 723 जण मरण पावले असून त्यामुळे करोनामुळे मरण पावलेल्यांची एकूण संख्या आता 4 लाख 2 हजार 728 इतकी झाली आहे.
दरम्यान, देशातील सक्रिय बाधितांची संख्याही मोठा प्रमाणात घटली असून आज देशातील एकूण सक्रिय बाधितांची संख्या 4 लाख 82 हजार 71 इतकी झाली आहे. देशाचा कोविड रिकव्हरी रेट आता 97.11 टक्के इतका झाला आहे.
दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेटही आता 2.61 टक्के इतका झाला आहे. गेले सुमारे महिनाभर हा दर पाच टक्क्यांच्या खाली राहिला आहे. दरम्यान, देशातील लसीकरणाचा प्रक्रिया धिम्या गतीने सुरू असली तरी देशात लस देण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या आता 35 कोटी 28 लाखांवर गेली आहे.





