प्रेयसीसोबत राहण्यासाठी हातपाय बांधून पत्नीवर चाकुने वार
Updated On:

पिंपरी – प्रेयसीसोबत एकत्र राहता यावे, यासाठी पती व त्याच्या प्रेयसीने जिवे मारण्याच्या उद्देशाने मिळून पत्नीचे पाय दोरीने बांधून तिच्या गळ्यावर चाकूने वार केले. हा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि.25) दुपारी चिंबळी येथे घडला असून पीडित महिलेने आंळदी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.26) फिर्याद दिली आहे. आरोपी पती व त्याच्या प्रेयसीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पती ला व त्याच्या प्रेयसीला घरात एकत्र रहायचे होते. यासाठी आपण हिला मारून टाकल्याशिवाय आपल्या दोघाना एकत्र राहता येणार नाही म्हणत आरोपींनी फिर्यादीचे पाय दोरीने बांधले व आरोपी महिलेने फिर्यादीचे हात पकडून पतीने तिच्या गळ्यावर चाकुने वार केले. आळंदी पोलीस तपास करत आहेत.





