\n

मी इथे आवर्जून नमूद करु इच्छिते की महाशिवरात्रीनिमित्त होणारा हा कार्यक्रम संपूर्णत: शास्त्रीय-उपशास्त्रीय संगीतावर आधारित असलेल्या नृत्याचा कार्यक्रम आहे. ज्यांना माहित नसेल त्यांना मी सांगू इच्छिते की मी स्वत: भरतनाट्यम नर्तिका आहे. मी विशारद, अलंकार केलेले आहे. त्यातच बीए, एमए केले आहे. तर अपुऱ्या माहितीमुळे जर कोणाचा गैरसमज झाला असेल तर त्यांनी त्यांच्या मनातील किंतू परंतू काढून टाकावे. समाजाची दिशाभूल करु नये, अशी मी त्यांना विनंती करते, असे म्हणत प्राजक्ताने ललिता शिंदे यांच्या प्रश्नांना त्यांचे नाव न घेता उत्तर दिले.

\n

प्राजक्ता माळी पुढे म्हणाली, एक गोष्ट आवर्जून सांगायची की देवाच्या दारात कोणी सेलिब्रिटी नसतो. सगळे भक्त असतात. त्याच भक्तीभावाने मी माझ्या नृत्याच्या माध्यमातून माझी सेवा नटराजाच्या चरणी रुजू करणार आहे. अर्पण करणार असल्याचे प्राजक्ताने सांगितले. म्हणूनच कार्यक्रमाचे नाव शिवार्पणमस्तु असे आहे. वेळेच्या कारणामुळे मी दोनच रचना सादर करणार आहे. बाकी रचना माझे सहकलाकार सादर करतील. मी निवेदन करणार आहे, असेही ती म्हणाली. चेंगराचेंगरी, गर्दीची भीती असेल तर विश्वस्त, पोलिस जो निर्णय घेतील तो सामाजिक भान बाळगत सर्वांवर बंधनकारक असणार आहे. तो सगळ्यांनाच मान्य असणार आहे, असे तिने स्पष्ट केले.

\n

प्राजक्ताचा नृत्य कार्यक्रम होणार – त्र्यंबकेश्वर विश्वस्त

\n

महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर येथे धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि सहकलाकार येथे शिवार्पणनस्तु नृत्य सादर करणार आहेत. पण या कार्यक्रमाला देवस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी विरोध दर्शवला आहे. दरम्यान प्राजक्ताच्या या व्हिडीओनतंर आता त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त मनोज थेट यांच्याकडूनही या वादावर आता स्पष्टीकरण देण्यात आले आहे. तसेच प्राजक्ता माळीचा त्र्यंबकेश्वरमधील कार्यक्रम होणार असून ती भरतनाट्यम आणि कथ्थक करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरवर्षी प्रमाणे अशा कार्यक्रमाचे यंदाही आयोजन करण्यात आले आहे. पुरातत्व विभागाकडूनच तशी परवानगी मिळाल्याचे मनोज थेट यांनी सांगितले.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Prajakta Mali : ‘मी भरतनाट्यम नर्तिका…’; त्र्यंबकेश्वरच्या कार्यक्रमाला विरोध करणाऱ्यांना प्राजक्ता माळीचे स्पष्ट शब्दांत उत्तर","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/02/prajakta-mali.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/dnyaneshwarphadeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/news-about-actress-prajakta-mali#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/02/prajakta-mali.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/news-about-actress-prajakta-mali#webpage","name":"Prajakta Mali : ‘मी भरतनाट्यम नर्तिका…’; त्र्यंबकेश्वरच्या कार्यक्रमाला विरोध करणाऱ्यांना प्राजक्ता माळीचे स्पष्ट शब्दांत उत्तर","url":"https://www.dainikprabhat.com/news-about-actress-prajakta-mali","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/news-about-actress-prajakta-mali#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/02/prajakta-mali.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/news-about-actress-prajakta-mali#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/news-about-actress-prajakta-mali","name":"Prajakta Mali : ‘मी भरतनाट्यम नर्तिका…’; त्र्यंबकेश्वरच्या कार्यक्रमाला विरोध करणाऱ्यांना प्राजक्ता माळीचे स्पष्ट शब्दांत उत्तर"}}]}}}

Prajakta Mali : ‘मी भरतनाट्यम नर्तिका…’; त्र्यंबकेश्वरच्या कार्यक्रमाला विरोध करणाऱ्यांना प्राजक्ता माळीचे स्पष्ट शब्दांत उत्तर