भारताच्या अ संघाचा नवोदीत युवा क्रिकेटपटू बनला पोशिंदा
Updated On:

नवी दिल्ली – भारताच्या अ संघाचा नवोदीत क्रिकेटपटू अभिमन्यु इश्वरन करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आला असून त्याने 100 लोकांच्या जेवणाचा बंदोबस्त हाती घेतला आहे. देशातील करोडपती खेळाडू मदतकार्यात हात अखडता घेताना पहायला मिळाले त्यामुळे इश्वरनचे पश्चिम बंगालमध्ये कौतुक केले जात आहे.
देशात करोनाच्या धोक्यामुळे लॉकडाऊन असल्याने रस्त्यावर राहणारे तसेच छोट्या वाड्या वस्त्यांवर राहणारे लोक दोन वेळच्या जोवणासाठी कोणी मदत करेल का याची वाट पाहात आहेत. त्याचवेळी ईश्वरनने पुढाकार घेतला व त्यांच्यासाठी जणु पोशिंदा मिळाला. गरीब लोकांचे किंबहुना हातावर पोट असलेल्या कामगारांचे प्रचंड हाल होत आहेत.





