Aamir Khan marriage : अभिनेता आमिर खानचं तिसरं लग्न ठरलं; होणाऱ्या पत्नीबाबत अन् लग्नाची तारीख जाणून घ्या…
Aamir Khan marriage : बॉलिवूड अभिनेता अमिर खान पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. आमिर खान आणि त्याची मैत्रीण गौरी स्प्रॅट यांच्या विवाहाबाबतच्या चर्चांना सध्या जोर आला असून, जुलै महिन्यात दोघेही खासगी समारंभात विवाहबंधनात अडकणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.

Aamir Khan marriage : बॉलिवूड अभिनेता अमिर खान पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. आमिर खान आणि त्याची मैत्रीण गौरी स्प्रॅट यांच्या विवाहाबाबतच्या चर्चांना सध्या जोर आला असून, जुलै महिन्यात दोघेही खासगी समारंभात विवाहबंधनात अडकणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
काही माध्यमांच्या अहवालानुसार, आमिर खान आणि गौरी स्प्रॅट ५ जुलै रोजी कुटुंबीय व अत्यंत जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत साध्या आणि खासगी समारंभात विवाह करणार आहेत. त्यांच्या निवासस्थानी विवाह नोंदणी व स्वाक्षरीचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मागील वर्षभरापासून आमिर आणि गौरी एकत्र राहत असून त्यांचे नाते अधिक दृढ झाले आहे. त्यामुळे या नात्याला अधिकृत स्वरूप देण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचे सांगितले जात आहे.
काही महिन्यांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत आमिर खानने गौरीबद्दल बोलताना, तिच्या आगमनामुळे आपल्या आयुष्यात स्थैर्य आणि आनंद आल्याचे म्हटले होते. गौरीसोबत असताना आपण स्वतःला भाग्यवान समजत असल्याचेही त्याने नमूद केले होते.
दरम्यान, आमिर खानने आपल्या ६० व्या वाढदिवसानिमित्त गौरी स्प्रॅटची माध्यमांशी ओळख करून दिली होती. त्यानंतर विविध कार्यक्रमांमध्ये दोघे एकत्र दिसले होते.
आमिर खानच्या वैवाहिक आयुष्याबाबत बोलायचे झाल्यास, त्याने १९८६ मध्ये रिना दत्ता यांच्याशी विवाह केला होता. या दाम्पत्याला आयरा आणि जुनैद ही दोन मुले आहेत. सुमारे १६ वर्षांच्या सहजीवनानंतर २००२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २००५ मध्ये त्याने दिग्दर्शिका किरण राव यांच्याशी विवाह केला. या दाम्पत्याला आझाद हा मुलगा असून २०२१ मध्ये दोघे विभक्त झाले.
तथापि, आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांच्या विवाहाबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे या वृत्ताला संबंधितांकडून दुजोरा मिळणे बाकी आहे.







