‘प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल व विद्यानिकेतन स्कूल’मध्ये नवगताचा स्वागत सोहळा रंगला !

– नीलकंठ मोहिते (प्रतिनिधी)
इंदापूर : प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल व विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लाखेवाडीमध्ये नवागतांचा प्रवेशोत्व स्वागत सोहळा. दरवर्षीप्रमाणे उन्हाळा सुट्टी संपून मुले आतुरतेने वाट पाहतात ती म्हणजे शाळेची.
घर सोडून पहिल्यांदा शाळेत येण्यासाठी बालचमुला लागलेली आस, नवीन शाळा, नवीन शिक्षक ,नवीन मित्र या सगळ्यांचीच असलेली ओढ घेऊन मुले आनंदाने विद्येचे माहेर ‘विद्या निकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल’ लाखेवाडीच्या प्रांगणात आगमन झाले.
नवागतांच्या स्वागतासाठी प्रशालेमध्ये जय्यत तयारी करण्यात आली होती. मुलांच्या मनातून शाळेची भीती दूर होण्यासाठी प्रशालेमध्ये आनंदमय वातावरण तयार करण्यात आले होते. त्यामध्ये विविध कार्टून्स, फुगे, सेल्फी पॉईंट, ठेवून मुलांचे मनोरंजन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले, संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले ,संस्थेचे सचिव हर्षवर्धन खाडे,संस्थेचे विश्वस्त ऋषिकेश ढोले, संस्थेचे प्रशासक गणेश पवार ,फार्मसी कॉलेजचे प्राचार्य सम्राट खेडकर,
संस्थेचे प्राचार्य राजेंद्र सरगर, सर्व सुपरवायझर,शिक्षक व विद्यार्थी पालक, यांच्या उपस्थितीत नवागतांचे व विद्यार्थ्यांचे औक्षण करून खाऊ व मोठ्या हर्षाने,उल्हासाने स्वागत करण्यात आले.





