Tanushree Dutta : “नवोदित कलाकार सुरुवातीला गोड बोलण्याला आणि…”; तनुश्रीने सांगितली इंडस्ट्रीची काळी बाजू, नेमकं काय म्हणाली?
Tanushree Dutta : बॅालिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने एक खळबळजनक दावा केला आहे. ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Tanushree Dutta : मी टू चळवळच्या माध्यमातून बॅालिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले होते. यानंतर अख्खी चित्रपटसृष्टी हादरून गेली. तेव्हापासून तनुश्री सतत कोणत्या कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नुकत्याच दिलेल्या एका पॅाडकास्टमध्ये तिने केलेल्या खळबळजनक दाव्यांमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.
पॅाडकास्टमध्ये तिने इंडस्ट्रीमधील नवोदित कलाकारांवरील शोषण, फसवणूक याविषयी अत्यंत गंभीर दावे केले आहेत. अनेक नवोदित कलाकार सुरुवातीला गोड बोलण्याला आणि आश्वासनांना भुलतात. मात्र त्यानंतर ते स्वतःला अत्यंत धोकादायक परिस्थितीत अडकलेलं पाहतात. त्यावेळी वेळ निघून गेलेली असते.
फसवणूक, शोषण आणि संधींची खोटी आश्वासनं देऊन त्यांना जाळ्यात ओढले जात असल्याचा मोठा दावा तनुश्रीने केला आहे. यावर ती म्हणाली, “त्यांना सांगितलं जातं, ‘तू खूप देखणा आहेस’ किंवा ‘तू खूप सुंदर आहेस’ आणि नेमक्या याच पद्धतीनं कोणीतरी त्यांना भुलवण्याचं काम करतं. त्यांच्याकडे खरोखरंच प्रतिभा आहे की नाही, हे मात्र कोणालाच ठाऊक नसतं.”
पुढे बोलताना अभिनेत्री म्हणाली, “काही लोक तुमचं कौतुक करत तुमच्या जवळ येतील, आणि त्यानंतर दुसरा एक ग्रुप येईल जो तुम्हाला भरकटवून टाकेल. आधी ते तुमचा आत्मविश्वास वाढवतात आणि मग तेच तुम्हाला ऑर्डर द्यायला सुरुवात करतात, असा सावधानगिरीचा इशारा दिला आहे.
यासोबतच तनुश्रीने इंडस्ट्रीतील एका काळ्या बाजूबद्दल खळबळजनक दावा केला आहे. “काही लोक वेश्याव्यवसायाकडे वळतात. कारण त्यांनी इतक्या तीव्र शोषणाचा सामना केलेला असतो की, अखेरीस इतर लोकच त्यांना या धंद्यात ढकलतात. काही व्यक्तींची मानसिक स्थिती इतकी बिघडते की, त्या केवळ आपल्या मूळ गावी परत जातात…” अशा गोष्टी क्वचितच जगासमोर येतात, कारण ही इंडस्ट्री केवळ यशाच्या स्टोरी प्रसिद्ध करण्याकडे कल ठेवते, असे प्ररखड मत तिने मांडले.





