Nagar | अमरधाममध्ये आढळले नवजात मृत अर्भक

नगर, (प्रतिनिधी) – शहरातील नालेगाव येथील अमरधाममध्ये नवजात मृत अर्भक अंत्यविधी न करता तसेच टाकल्याची घटना घडली होती. याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळताच पोलिसांनी तपासाचे चक्रे फिरवली आणि अर्भकाच्या आई-वडिल नातेवाईकांचा शोध घेतला. तसेच पोलिसांनी या घटनेतील आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
अरमरधाम येथील एका खोलीत नवजात मृत अर्भक कोणीतरी आणून टाकले आहे, अशी माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली. त्यांनी तातडीने पोलीस कर्मचार्यांसह अमरधाम येथे भेट दिली. आणि या घटनेचा तपास करण्याची सूचना केली.
गुन्हे शोध पथकातील सुरज कदम आणि सुजय हिवाळे यांनी जिल्हा रुग्णालयात मृत अर्भकाच्या नातेवाईकांचा शोध घेतला. अर्भकाचे वडिल व नातेवाईकांकडे विचारपूस केली असता, त्यांनी पोलिसांना सांगितले की, नवजात अर्भक हे जन्म घेण्यापूर्वीच मयत झाले होते. त्याचा अंत्यविधी करण्यासाठी त्यास नालेगाव येथे घेऊन गेले असता त्यांना तेथे एक अनोळखी व्यक्ती भेटला.
अमरधाम येथे त्या अर्भकाचा मी अंत्यविधी करतो, असे त्याने सांगितले. अर्भकाच्या आईस आयसीयुमध्ये अॅडमीट करायचे असल्याने त्यांनी अर्भक अंत्यविधीसाठी त्या व्यक्तीकडे सुपूर्द केले. व ते तेथून निघून गेले. त्यानंतर कोतवाली पोलिसांनी तपासाचे चक्र फिररवत मिळालेल्या माहितीनुसार् अर्जून मुथ्था स्वामी याचा शोध घेत गुन्हा दाखल केला. व त्या अर्भकावर पोलिसांच्या उपस्थित अंत्यसंस्कार करण्यात आले.





