Newasa News : देवगड संस्थानच्या पंढरपूर येथील मठामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालखी दिंडीचे स्वागत
तीर्थक्षेत्र नेवासे (Newasa News) येथून ८ जुलै रोजी पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या 'संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान'च्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालखी दिंडीचे बुधवारी सायंकाळी श्री विठ्ठलाच्या नगरीत आगमन झाले.

Newasa News : तीर्थक्षेत्र नेवासे (Newasa News) येथून ८ जुलै रोजी पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या ‘संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान’च्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालखी दिंडीचे बुधवारी सायंकाळी श्री विठ्ठलाच्या नगरीत आगमन झाले.
पंढरपूर येथील देवगड संस्थानच्या मठात दिंडी दाखल झाल्यानंतर देवगड संस्थानच्या वतीने माऊलींच्या या दिंडीचे अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले.
ही दिंडी (Newasa News) संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख वेदांताचार्य ह.भ.प. देविदासजी महाराज म्हस्के शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली नेवासे येथून पंढरपूरकडे रवाना झाली होती.
‘पुंडलिक वरदा हरि विठ्ठल’च्या जयघोषात पादुका पूजन
ग्रंथराज ज्ञानेश्वरी दिंडी पंढरपूर येथील देवगड मठाबाहेर (Newasa News) आली असता, ‘श्री गुरुदेव दत्त पीठ देवगड संस्थान’चे प्रमुख महंत राष्ट्रसंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबा आणि उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते माऊलींच्या पवित्र पादुकांचे विधीवत पूजन करण्यात आले. या वेळी उपस्थितांनी केलेल्या ‘पुंडलिक वरदा हरि विठ्ठल… श्री ज्ञानदेव तुकाराम’ या नामघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसपूर्ण झाला होता.
गुरुवर्य भास्करगिरीजी बाबांचा सन्मान
पालखी स्वागत सोहळ्यादरम्यान वेदांताचार्य ह.भ.प. देविदासजी महाराज म्हस्के शास्त्री यांच्या हस्ते राष्ट्रसंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबा यांना सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांचे संतपूजन करण्यात आले.
या सोहळ्यास ह.भ.प. राम महाराज झिंजूर्के, देवगडचे संतसेवक नामदेव महाराज कंधारकर, वेदमूर्ती भगवान महाराज जंगले शास्त्री, रामायणाचार्य नंदकिशोर खरात, अंकुश महाराज जगताप, नारायण महाराज ससे, गणपत महाराज आहेर, रामनाथ महाराज पवार, बाळू महाराज कानडे, तात्या महाराज शिंदे, लक्ष्मण महाराज नांगरे, शुभम महाराज बनकर, आदिनाथ महाराज पांगरे, रोहित महाराज पटारे, गणेश महाराज तनपुरे, शशिकांत महाराज कोरेकर, सोमनाथ महाराज पानकडे यांच्यासह उद्योजक दिनकरराव कदम, किरण धुमाळ, भाऊ कोकणे, कचरूतात्या भागवत, रामेश्वर तनपूरे, भीमाशंकर वरखडे, उमाकांत कंक, बद्रीनाथ फोलाणे, आदिनाथ जाधव, दामोदर पवार, ईश्वर मते, बंटीभाऊ पठाडे आणि मोठ्या संख्येने वारकरी व भाविक उपस्थित होते.






