Newasa News : तेलकूडगाव येथील घाडगे पाटील विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमीत्त मातृ-पितृ पूजन व पालक मेळावा उत्साहात संपन्न!
तेलकुडगाव (ता. नेवासे) येथील कै. संत हरिभाऊ आनंदराव घाडगेपाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमेचा सण उत्साहात पार पडला.

Newasa News : तेलकुडगाव (ता. नेवासे) येथील (Newasa News) कै. संत हरिभाऊ आनंदराव घाडगेपाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून ‘गुरुपौर्णिमा उत्सव’, ‘मातृ-पितृ पूजन’ आणि ‘शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी सन्मान सोहळा’ व ‘पालक मेळावा’ असा तिहेरी सोहळा त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात अत्यंत उत्साहात व भावपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाची (Newasa News) सुरुवात “गुरूर ब्रह्मा गुरूर विष्णु…” या मंत्रोच्चारासह माता सरस्वती आणि गुरुवर्य बाबास्वामी यांच्या प्रतिमेच्या पूजनाने व ध्यान-धारणेने झाली. यानंतर पब्लिक स्कूलच्या लहान बालसैनिकांनी सुरेख नृत्याविष्कार सादर करत शिक्षक आणि पालकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या उपक्रमशील शिक्षिका वैशाली उभेदळ या होत्या. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून ॲड. सचिन घोडेचोर, सरपंच सतीश काळे, संभाजी घोडेचोर, श्रीकांत घाडगे, दीपक दीपकने, सोपान घोडेचोर, नवनाथ काळे, ज्योती काळे, सुधाकर माने, विजय गायकवाड, देविदास गायकवाड, संतोष पुरी, सोनाली काळे, जगन्नाथ सरोदे, संदीप काळे, अप्पासाहेब काळे, दादा म्हस्के, मल्हारी परभणे, भाऊसाहेब घोडेचोर, चांगदेव टकले, प्राचार्य भाऊसाहेब दुधाडे व प्रशासक मनीषा राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार केल्यानंतर, शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
विद्यार्थ्यांमध्ये (Newasa News) उच्च संस्कार, ज्ञान, शिक्षण आणि पालकांप्रती कृतज्ञतेची भावना रुजावी या उद्देशाने ‘मातृ-पितृ पूजन’ हा विशेष उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्वतः आणलेल्या पूजेच्या साहित्याने आपल्या आई-वडिलांचे मनोभावे पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले. या प्रसंगी अनेक पालक व विद्यार्थी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
मनोगत व्यक्त करताना ॲड. सचिन घोडेचोर, सरपंच सतीश काळे व प्रशासक मनीषा राऊत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत मानवी जीवनातील गुरू आणि पालकांचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले.
या कौतुकास्पद सोहळ्याला विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद कराड यांनी केले, तर सूत्रसंचालन रेणुका काळे व जयश्री भांगे यांनी केले. शेवटी विद्यालय प्रशासनाच्या वतीने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानण्यात आले.






