#NZvSL 1st Test : श्रीलंकेचा पराभव भारताच्या पथ्यावर; Sri Lanka जिंकली असती तर….

ख्राईस्टचर्च – श्रीलंकेचा यजमान न्युझीलंडने केलेला पराभव भारतीय संघाच्या पथ्यावर पडला आहे. श्रीलंकेच्या पराभवामुळे आता भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यासाठी पात्र ठरला आहे. न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील या पहिल्या कसोटी सामन्यात जर श्रीलंका जिंकली असती तर भारतीय संघाचे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत प्रवेश करण्याचे स्वप्न भंगले असते.
New Zealand scurry to a famous Test win running a bye off the final ball!
Sri Lanka’s push for a spot in the #WTC23 final falls agonisingly short!#NZvSL Scorecard: https://t.co/p873rNARKS pic.twitter.com/CnFWN8xBti
— ICC (@ICC) March 13, 2023
मात्र, तसेच घडले नाही विजयासाठी आवश्यक 285 धावा न्यूझीलंडने माजी कर्णधार केन विल्यसनच्या तसेच डॅरेल मिशेल जोरावर पूर्ण केल्या व विजय मिळवला. या सामन्याच्या सोमवारच्या पाचव्या व अखेरच्या दिवसातील अखेरच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर न्यूझीलंड संघाने हा सामना 2 गडी राखून जिंकला. विल्यमसन या सामन्याचा हिरो ठरला. त्याने अखेरच्या षटकात पाचव्या चेंडूवर चौकार फटकावला व त्यानंतर अखेरच्या चेंडूवर विल्यमसनने धाव घेतली व विजय साकार केला. अर्थात हा चेंडू पंचांनी बाय घोषित केला.
या कसोटीत प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 355 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडने पहिल्या डावात 373 धावा करत आघाडी घेतली होती. श्रीलंकेचा दुसरा डाव डाव 302 धावांवर संपला व न्यूझीलंडसमोर विजयासाठी 285 धावांचे आव्हान निर्माण झाले. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा त्यांनी दुसऱ्या डावात 1 बाद 28 धावा केल्या होत्या व त्यांना आणखी 257 धावांची गरज होती.
विल्यमसन व मिशेल यांनी भक्कम फलंदाजी करत श्रीलंकेच्या अपेक्षांना अपयशी ठरवले. पाचव्या दिवसाचा खेळ सुरु असतानाच पावसाने काही काळ व्यत्यय आणला मात्र, त्यानंतर खेळ सुरु झाला. विल्यमसनने आपले 27 वे कसोटी शतकही साकार केले. विल्यमसनने नाबाद 121 धावांची खेळी केली. मिशेलने 81 धावांची खेळी केली.
संक्षिप्त धावफलक –
श्रीलंका पहिला डाव – 355 धावा. न्यूझीलंड पहिला डाव – 373 धावा. श्रीलंका दुसरा डाव – 302 धावा. न्यूझीलंड दुसरा डाव – 70 षटकांत 8 बाद 286 धावा. (डॅरेस मिशेल 81, केन विल्यमसन नाबाद 121, असिता फर्नांडो 3-63, प्रभात जयसूर्या 2-92).





