Mitchell Phillips Record : इंदूरमध्ये कीवींचा भीमपराक्रम! मिचेल-फिलिप्सच्या शतकांनी रचला इतिहास; भारतात पहिल्यांदाच घडलं असं

Mitchell Phillips Partnership Record : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात न्यूझीलंडने धावांचा पाऊस पाडला आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने निर्धारित ५० षटकांत ८ बाद ३३७ धावा केल्या. डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स या जोडगोळीने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत ऐतिहासिक शतके झळकावली आणि अनेक मोठे विक्रम मोडीत काढले.
न्यूझीलंडच्या क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच घडलं!
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात आज पहिल्यांदाच एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली. न्यूझीलंडच्या डावात एकाच वेळी दोन फलंदाजांनी शतके ठोकण्याची ही पहिलीच वेळ आहे. डॅरिल मिचेलने १३७ धावांची तुफानी खेळी (या मालिकेतील सगल दुसरे शतक) केली.
Centuries for Glenn Phillips and Daryl Mitchell take the team to 337/8 at the innings break 💪
Watch all the action live in NZ on Sky Sport.#INDvNZ | 📸 BCCI pic.twitter.com/98GLVRXpdu
— BLACKCAPS (@BLACKCAPS) January 18, 2026
मिचेलला साथ देताना ग्लेन फिलिप्सने १०६ धावांची शानदार खेळी (कारकिर्दीतील दुसरे वनडे शतक) साकारली, ५८ धावांवर ३ विकेट्स गेल्यानंतर या दोघांनी कीवींचा डाव सावरला आणि संघाला ३०० पार नेले.
हेही वाचा – Harshit Rana : हर्षितची ‘ती’ एक चूक भारताला पडली महागात! फिलिप्सला मिळालं जीवदान आणि कीवींनी फिरवला सामना
२१९ धावांची साकारली ऐतिहासिक भागीदारी –
डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी चौथ्या विकेटसाठी २१९ धावांची अवाढव्य भागीदारी केली. भारताविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोणत्याही विकेटसाठी न्यूझीलंडकडून झालेली ही दुसरी सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. त्याचबरोबर भारतातली पहिली सर्वात मोठी भागीदारी आहे.
- नंबर १: टॉम लॅथम आणि केन विल्यमसन (२२१ धावा, २०२२ – ऑकलंड).
- नंबर २: डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स (२१९ धावा, २०२६ – इंदूर).
हेही वाचा – Daryl Mitchell : टीम इंडियासाठी ‘व्हिलन’ ठरतोय डॅरिल मिचेल! सलग दुसरं शतक ठोकत मोडला सलमान बटचा विक्रम
हर्षित राणाची ‘ती’ चूक पडली महागात –
जेव्हा ग्लेन फिलिप्स १८ धावांवर खेळत होता, तेव्हा हर्षित राणाने त्याचा सोपा झेल सोडला होता. त्या एका जीवदानाचा फायदा घेत फिलिप्सने शतक झळकावले आणि मिचेलच्या सोबतीने भारताच्या हातातून सामना हिरावून घेण्याचा प्रयत्न केला. आता भारताला ही मालिका जिंकण्यासाठी ३३८ धावांचे कठीण आव्हान पार करावे लागणार आहे.





